पाथर्डीत भाजपचा निर्धार मेळावा उत्साहात; अक्षय कर्डिले यांची विकासाची ग्वाही
मिरी येथील चैतन्य मंगल कार्यालय तसेच लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यांमध्ये कर्डिले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
Akshay Kardile’s promise of development : निर्धार मेळाव्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला.गावांच्या विकासासाठी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेती आदी मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाथर्डी तालुक्यात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेले निर्धार मेळावे उत्साहात पार पडले. मिरी येथील चैतन्य मंगल कार्यालय तसेच लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यांमध्ये कर्डिले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
या मेळाव्यांमध्ये आयोजित ‘जनता दरबार’ हा उपक्रम विशेष ठरला. नागरिकांनी आपल्या समस्या थेट मांडताच कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही प्रश्न तत्काळ मार्गी लावले, तर उर्वरित प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. मिरी, शंकरवाडी, रुपेवाडी, रेणुकाईवाडी, कडगाव, आडगाव, केशवशिंगवे, कामतशिंगवे तसेच लोहसर, पवळवाडी, खांडगाव, भोसे, बैजुबाभुळगाव, जोहारवाडी, राघुहिवरे, गितेवाडी, धारवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, शिराळ, चिचोंडी आणि कोल्हार या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंकशास्त्राचा गप्पा मारणारा ‘कॅप्टन’ गणितातच ‘ढ’ दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची ‘कुंडली’
या निर्धार मेळाव्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.