Download App

असंभव! सचित पाटिल आणि मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र, सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Sachit Patil and Mukta Barve’s upcoming film Asambhav : मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे (Mukta Barve) पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ (Asambhav) ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या 1 मे 2025 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र (Marathi Movie) आल्या आहेत.

बीडमधील लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्या, शरद पवारांचे CM फडणवीसांना पत्र

वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या सिनेमाला लाभणार (Entertainment News) आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच निर्माते शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा महाराष्ट्रभर गाजला होता. त्यामूळे या आगामी सिनेमाकडून देखिल प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

तुमच्या मोठमोठ्या संस्था आहेत, तिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण द्या; खासदार लंकेंचा विखेंवर पलटवार

हाय काय नाय का, ,उबुंटू या सिनेमानंतर आता दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री ‘असंभव’ या सिनेमाचं देखिल दिग्दर्शन करत आहेत. इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? असा प्रश्न उपस्थित होतोय. ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृती आहे की, एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सचित पाटिल आणि मुक्ता बर्वे यांचा आगामी चित्रपट ‘असंभव’ 1 मे 2025 ला प्रदर्शित होणार आहे. नैनीतालमध्ये ‘असंभव’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडलाय. प्रेक्षकांसाठी येत्या महिन्यात मेजवानी आहे. मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांचा ‘असंभव’ 1 मे 2025 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांना देखील चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे.

 

follow us