बीडमधील लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्या, शरद पवारांचे CM फडणवीसांना पत्र
Sharad Pawar letter to CM Devendra Fadnavis : मस्साजोग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) पत्र लिहिल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना जीवितास धोका पोहचू नये यासाठी खबरदारी घ्यावी, सुरेक्षाचा आढावा घेऊन त्यांना शासनामार्फत पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शरद पवारांकडून करण्यात आली आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय.
तुमच्या मोठमोठ्या संस्था आहेत, तिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण द्या; खासदार लंकेंचा विखेंवर पलटवार
मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मरसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुडांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. या अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात (Santosh Deshmukh Murder Case) उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी, म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिलाCM आक्रोश मोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी… pic.twitter.com/utwEDgoKMQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2025
शरद पवारांनी निवेदनात म्हटलंय की, फरार आरोपीना आणि त्यामागील सुत्रधाराना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. या आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री सदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, (Maharashtra Politics) जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार श्री. बजरग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुड, घटनेचे सुत्रधार आणि घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परपरेला लाछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा, याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भुमिका बजावीत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण तापलं; शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, काय आहे मागणी?
संतोष देशमुख याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नाही. तर यापूर्वी हत्या, अपहरण, खडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनाची पाळेमूळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच या मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलीय की, या घटनेविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या जिवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलिस संरक्षण राज्यशासनामार्फत पुरवण्यात यावे, अशी मागणी देखील केलीय.