Download App

‘आलेच मी’ असं म्हणत सईच्या लावणीची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Sai Tamhankar :  काही दिवसांपासून सई ताम्हणकर चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तितकच खास आहे. सई आगामी देवमाणूस (Devmanus) चित्रपटात

  • Written By: Last Updated:

Sai Tamhankar :  काही दिवसांपासून सई ताम्हणकर चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तितकच खास आहे. सई आगामी देवमाणूस (Devmanus) चित्रपटात पहिल्यांदा लावणीवर थिरतकाना दिसणार आहे. सईच्या (Sai Tamhankar) या लावणीच नाव ” आलेच मी” अस असून सोशल मीडिया वर या गाण्याचा टीझर चांगला व्हायरल होताना दिसतोय. सईला पहिल्यांदा लावणी करताना बघण ही एक पर्वणी तर असणार आहे पण तिच्या लूक्स ने यात देखील लक्ष वेधून घेतलं आहे.

नऊवारी साडी आणि सईच्या अनोख्या अदा असलेला आलेच मी चा टीझर चर्चेचा विषय ठरतोय. नावीन्यपूर्ण भूमिका करणारी सई सध्या जोरदार काम करताना दिसतेय आणि सोबतीला तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच तितक्याच दणक्यात प्रमोशन सुद्धा करतेय. सई ही कायम तिच्या फॅशन आणि वैविध्यपूर्ण भूमिका साठी ओळखली जाते आणि अश्यातच सईची लावणी लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.

‘लव फिल्म्स’चा पहिला मराठी चित्रपट असलेल्या या चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) , रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) हे प्रमुख भूमिकेत आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देओस्कर यांनी केले आहे. या चित्रपटाने त्याच्या प्रभावी टीझरदवारे आणि ‘पांडुरंगा’ या भावपूर्ण गाण्याने चित्रपटासंदर्भातील प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षक या चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

या चित्रपटाच्या लेखिका नेहा शितोळे यांनी सांगितले, “आम्ही मराठी प्रेक्षकांना त्यांची स्वत:ची, जिवाभावाची कथा वाटेल, अशी कथा सांगण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. वारकऱ्यांचे भावपूर्ण चित्रण, पैठणी साडी विणणाऱ्याचे मूलतत्त्व, एक फक्कड लावणी आणि इतर पारंपरिक लोककला हे सारे या चित्रपटाच्या कथेत आहे. अशा प्रकारे मराठमोळा वारसा असलेल्या समृद्ध घटकांचा समावेश आम्ही या चित्रपटात केला आहे, जो रंजक तर आहेच, त्याचबरोबर कथेसोबत विरघळून जाणारा आहे. ही कथा रूपांतरित असूनही त्यांच्या स्वतःच्या मातीत घडली आहे ही भावना प्रेक्षकांमध्ये दाटून येण्याकरता हा सारा प्रयास आहे, ज्यामुळे त्यांच्या विविध भावभावना उचंबळून येतील आणि त्याच वेळी त्यांचे रंजनही होईल.”

‘फुले’ चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा… म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर

follow us