Download App

सलवार सूट अन् ग्लॅमर! ग्राउंड झीरोच्या प्रमोशनसाठी सईची अनोखी फॅशन…

Sai Tamhankar’s unique fashion for promotion of Ground Zero : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या आगामी ‘ग्राउंड झीरो’च्या (Ground Zero) प्रमोशनमध्ये एवढी व्यस्त आहे, तरीही तिच्या या मल्टीटास्किंग गोष्टीचं कौतुक होताना (Entertainment News) दिसतंय. बॅक टू बॅक शूट आणि त्यातून प्रवास, चित्रपटाचं प्रमोशन करून सई तिचे फॅशन गेम तितकेच खास करताना दिसतेय.

चित्रपटसृष्टीत 38 वर्षांनी पहिल्यांदा श्रीनगर मध्ये एखाद्या चित्रपटाच स्क्रिनिंग झालं. हा ऐतहासिक सोहळा सईने (Sai Tamhankar Movie) ग्राउंड झीरो निमित्तानं अनुभवला. श्रीनगरनंतर दिल्ली अश्या दोन्ही ठिकाणी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग पार पडलं आहे. ग्राउंड झीरोच्या या ग्रँड प्रीमियरसाठी सईने साधा पण तितकाच लक्षवेधी पेहराव केला होता.

‘भाजपमध्ये या’, चंद्रकांत पाटलांकडून महिनाभरात विशाल पाटलांना दुसऱ्यांदा ऑफर …कारण काय?

सईने श्रीनगर येथील ग्रँड प्रीमियर साठी लाल रंगाचा आकर्षक आणि तितकाच सुंदर सलवार सूट घातला होता, तिच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ग्लॅमर आणि तिच्या लक्षवेधी लूकने ती पुन्हा स्पॉट लाईटमध्ये चमकून गेली. एवढंच काय, तर सईने (Sai Tamhankar Look) दिल्लीमधल्या स्क्रिनिंग आणि प्रेस इंटरव्ह्यूसाठी देखील खास आणि सुंदर लूक केला होता. ब्लू फ्लोरल प्रिंटेड सलवारमध्ये सईचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. दिल्लीमधल्या प्रेस इंटरव्ह्यूसाठी सईने गुलाबी रंगाचा ग्लोइंग सलवार कमीज परिधान केला होता.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकार अलर्ट! धर्मादाय रुग्णालयांसाठी मोठा निर्णय, नवे निर्देश जारी

या सलवार सुटने पुन्हा एकदा सईच्या स्टाईल स्टेटमेंटच्या चर्चा होताना (Ground Zero Movie) दिसतात. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई कायम ओळखली जाते, पण तिच्या फॅशन चॉईस देखील सगळ्यांना भुरळ पाडून जातात. गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड मधल्या कामाची रेलचेल बघायला मिळते, असं म्हणायला हरकत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करून सई बॅक टू बॅक बॉलिवुड प्रोजेक्ट्समध्ये अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतेय. येणाऱ्या काळात सई अजून कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे, यात शंका नाही.

 

follow us