Bigg Boss 18 Winner : बिग बॉसचं १८वं पर्व गेल्या १०५ दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होतं. ६ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेल्या या पर्वाने १९ जानेवारीला प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Bigg Boss ) बिग बॉसच्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा ठरला आहे.
प्रेक्षकांच्या भरघोस मतांनुसार करणवीर मेहरा बिग बॉस १८ विजयी झाल्याची घोषणा सलमान खानने केली. विवियन डिसेना हा पहिला रनर-अप तर रजत दलाल दुसरा रनर-अप ठरला. करणवीर जिंकल्यामुळे सध्या इतर कलाकार मंडळींसह चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.
बिग बॉसमध्ये फक्त टीआरपीसाठी; वादग्रस्त दाखवलं जायचं; घनश्याम दरोडेनी केला खळबळजनक खुलासा
बिग बॉसचं १८वं पर्व जिंकल्यानंतर करणवीर मेहरा म्हणाला की, मी ज्या क्षणाची वाट बघत होतो. अखेर तो क्षण आलाच. जनतेचा लाडका विजयी झाला. करणला बिग बॉसच्या ट्रॉफीसह ५० लाखांचा धनादेश मिळाला. याआधी करणने खतरों के खिलाडीचं १४वं जिंकलं होतं. त्यामुळे सध्या करणची तुलना सिद्धार्थ मल्होत्राबरोबर केली जात आहे. दरम्यान, करणवीर मेहरा विजयी होताच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
दरम्यान, बिग बॉसच्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात सहा सदस्य पोहोचले होते. यामधून सर्वात आधी ईशा सिंह एविक्ट झाली. त्यानंतर चुम दरांग, अविनाश मिश्रा घराबाहेर झाला. या दोघांनंतर रजत दलाल एलिमिनेट झाला. हे एलिमिनेशन जाहीर करताना सलमान खानला आश्चर्याचा धक्का बसला होता. अखेर करणवीर मेहरा, विवियन डिसेना या दोघांत चुरस पाहायला मिळाली आणि करण बिग बॉस १८चा महाविजेता ठरला.