Download App

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एका आरोपीला हरियाणातून अटक

Salman Khan Firing Case: मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगला फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे (Mumbai Police) शाखेला मोठे यश मिळाले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime) हरियाणातील (Haryana) फतेहाबाद येथून सहाव्या आरोपीला अटक केली आहे. हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हरपालने आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्यास सांगितले होते.


14 एप्रिल रोजी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत विकी गुप्ता, सागर पाल, अनुज थापन, सोनू बिश्नोई, रफिक चौधरी यांना अटक केली आहे. अटकेनंतर अनुज थापनने पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. अनुज थापनचे कुटुंबीयही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

पंजाबमधून पाचव्या आरोपीला अटक

याआधी मुंबई क्राईम ब्रँचने पाचवा आरोपी मोहम्मद रफिक याला पंजाबमधून अटक केली होती. चौधरीने सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांनाही पैसे दिले होते आणि सलमानच्या घराची रेकी करायला सांगितले होते. आता सहाव्या आरोपीला अटक केल्यानंतर हरपाल सिंगने रफिकला पैसे देऊन हे काम करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे.

तपासानंतर मुंबई क्राईम ब्रँचने सांगितले होते की, सलमान खानच्या घराबाहेर 7 राउंड फायरिंग झाल्या. गोळीबारापूर्वी आरोपींनी सलमानच्या घराची तीन वेळा फेरफटका मारल्याची कबुली चौकशीत आरोपींनी दिली आहे.

Aranmanai 4 च्या यशाने राशीचं भविष्य उजळलं; बॉक्स ऑफिसवर केली हॅट्रीक

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने घेतली होती. अनमोलने फेसबुकवर पोस्ट टाकून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. लॉरेन्सने सलमान खानला अनेकदा उघडपणे धमक्याही दिल्या आहेत. अनमोल अमेरिकेत लपून बसल्याचा संशय असून पोलिसांनी दोघांनाही या प्रकरणात आरोपी बनवून त्यांना वॉण्टेड घोषित केले आहे.

follow us