Aranmanai 4 च्या यशाने राशीचं भविष्य उजळलं; बॉक्स ऑफिसवर केली हॅट्रीक

Aranmanai 4 च्या यशाने राशीचं भविष्य उजळलं; बॉक्स ऑफिसवर केली हॅट्रीक

Aranmanai 4 brighten Rashi Khanna Future : तमिळ अभिनेत्री राखी खन्नाने ( Rashi Khanna) आता बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू केली आहे. तुकतीच ती तमन्ना भाटीयाच्या अरनमनाई 4 ( Aranmanai 4) या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या यशाने राशी खन्नाचे भविष्य आणखी उजळलं असल्याचं सिद्ध केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईमुळे राशीच्या करिअरमधील हॅट्रीक झाली आहे.

लग्न कधी करणार? भरसभेत राहुल गांधीना प्रश्न, उत्तर देत म्हणाले, लवकर करावे लागेल..

तमिळमधील तिचा हा प्रचंड यश मिळवणारा तिसरा चित्रपट आहे. ज्यामध्ये सरदार, आणि थिरुचित्रंबलम तर आताच्या अरनमनाई 4 चा समावेश आहे. सध्या राशी तिच्या आगामी तमिळ चित्रपट ‘अरनमनाई 4’ मधील (Aranmanai 4) ‘अचाचो’ (Achacho Song) गाण्यात तिच्या लुकसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Mumbai मध्ये वादळी पावसाचा कहर; बॅनर कोसळल्याने मेट्रो ठप्प, प्रवाशांचे मोठे हाल

“योद्धा” फेम अभिनेत्रीने या गाण्यासाठी खास मेहनत देखील घेतली आहे. टोन्ड बॉडी करण्यासाठी राशीने खास डाएट देखील फॉलो केल्याचं सांगितलं आहे. फिटनेसचा कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो यावर जोर देऊन राशी म्हणाली ” मी या गाण्यासाठी खास कष्ट घेतेले आहेत. 12 ते 16 तासांच्या शूटिंगच्या दिवसातही मी माझ्या वर्कआउटसाठी वेळ काढते. रोज नियमित व्यायाम करून डाएट पाळून मी या गाण्यासाठी तयार झाली आहे. अगदी रविवारच्या चीट डेसाठी सुद्धा निरोगी आहार ठेवून मी या गाण्यासाठी टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी मेहनत घेतली आहे.

तिच्या कमाबद्दलच्या या गोष्टीचं सध्या सर्वत्र तोंडभरून कौतुक करावं तितकं कमीच आहे. याआधी ‘मद्रास कॅफे’ आणि ‘योद्धा’ सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवणारी ही अभिनेत्री हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ मध्ये कमालीची भूमिका साकारणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज