Aranmanai 4 गाण्याचा प्रोमो आऊट! तमन्ना- राशी चा दिसला खास अंदाज

Aranmanai 4 गाण्याचा प्रोमो आऊट! तमन्ना- राशी चा दिसला खास अंदाज

Aranmanai 4 songs promo Out : दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia ) सध्या सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असते. त्यात आता तमन्ना आणि राशी खन्नाचा ‘अरनमानाई 4’ ( Aranmanai 4 ) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज ( songs promo Out ) झाला आहे.

Sonalee Kulkarni : बाण नजरेचा घेऊन अवतरली सुंदरा, सोनालीचा खास लूक

‘अरनमलाई 4’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच ‘अच्छा’ नावाचे प्रमोशनल व्हिडिओ गाणे रिलीज केले. या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या फर्स्ट लूकने (First look) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. ‘लवकरच चार्टबस्टर बनणारं ‘अच्छाचो’ हे प्रतिभावान खरेस्मा रविचंद्रन यांच्या गायनासह हिपॉप तमिझा यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे विघ्नेश श्रीकांतने लिहिले आहे आणि वृंदा मास्टरने कोरिओग्राफ केले आहे.

तमन्ना आणि राशी व्यतिरिक्त, ‘अरनमानाई 4’ स्टार्स सुंदर सी, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश आणि कोवई सरला प्रमुख भूमिकेत आहेत. करिअरच्या आघाडीवर, तमन्नाकडे निखिल अडवाणीचा ‘वेद’ आणि नीरज पांडेचा हिंदीतला पुढचा, आणि तेलगूमध्ये ओडेला २ पाइपलाइनमध्ये आहे. नुकतीच ‘योधा’ मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी राशी, अनुक्रमे ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’ हिंदीमध्ये विक्रांत मॅसीसोबत दिसणार आहे, तर तिच्याकडे तेलगू चित्रपट ‘तेलुसू कडा’ देखील आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट, पुष्कर जोग साकारणार भूमिका

तसेच तमन्ना भाटिया या उत्कंठावर्धक चित्रपटासाठी चाहते देखील मोठे उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे. तमन्नाचा आणखी एका उत्कृष्ट प्रोजेक्टची सगळेच वाट बघत आहे. तसेच जॉन अब्राहमसोबत दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या ‘वेदा’ मधील तिच्या आगामी भूमिकेसाठी चाहते चांगलेच उत्सुक झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज