Download App

Salman Khan चा नवा लूक ‘तेरे नाम 2’ साठी तर नाही; नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

Salman Khan New Look : बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान ( Salman Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यावेळी तो त्याच्या नव्या लूकमुळे ( New Look ) चर्चेत आला आहे. नुकतचं एका पार्टीमध्ये सलमान त्याच्या या नव्या लूकमध्ये दिसून आला. त्याचा हा लूक पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्याच्या या लूकला काही लोक आगामी चित्रपटाची तयारी म्हणत आहेत. तर काही लोकांनी त्याची खिल्ली देखील उडवली आहे.

Viajykumar Gavit तुमचं डोकं भंगार, लाज लज्जा…; ‘त्या’ विधानावर शरद कोळी भडकले

कसा आहे सलमानचा नवा लूक (New Look )?
सलमान खान जो कोणता चित्रपट करतो. त्याचा लूक तो पुर्णपणे फॉलो करतो. त्यामुळ यावेळी त्याने केलेला लूक देखील असाच विशेष असणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावेळी सलमानने टक्कल केलेलं पाहायला मिळालं आहे. त्याचा हा लूक ‘तेरे नाम 2’ या चित्रपटाची तयारी केली जात असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्याच्या या लूकवर त्याने विग घालायला विसरला असल्याचे म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.

‘माश्यांमुळे ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर, नियमित खाल्यास बाईमाणूस पण चिकनी दिसते : मंत्री गावितांचं वक्तव्य

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानने ‘तेरे नाम 2’ या चित्रपटाची हिंट दिली होती. तर काही लोक सलमानचा हा लूक टायगर 3 साठी असल्याचं देखील म्हटलं आहे. तर करण जोहरच्या डायरेक्टर विष्णू वर्धन दिग्दर्शित आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे. त्यामुळे हा त्या चित्रपटासाठीचा देखील असणार आहे. असं देखील बोलल जात आहे.

नुकतचं एका पार्टीमध्ये सलमान त्याच्या या नव्या लूकमध्ये दिसून आला. यावेळी तो गाडीतून उतरला तेव्हा त्याने ब्लॅक शर्ट, ब्लॅक जीन्स, ब्लॅक शूज घातलेले होते. मात्र इतर वेळी सलमान कॅज्युअल लूकमध्ये दिसत असतो. यावळी तो टक्कल केलेल्या लूकमध्ये दिसला त्यामुळे गजनी आणि तेरे नामची आठवण झाली.

Tags

follow us