Download App

Salman Khan: भाईजानच्या घरावरील गोळीबाराचे खरं कारण आलं समोर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात काय म्हटले? वाचा…

Salman Khan : सलमान खान गोळबार प्रकरणात ( Salman Khan House Firing) मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Salman Khan Firing Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात 1 हजार 736 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.(Salman Khan House Firing) या चार्जशीटमध्ये एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित बिश्नोई टोळीबाबत खुलासा करण्यात आला आहे.


आरोपपत्रात काय म्हटले आहे?

उत्तर-पश्चिम भारतात यश मिळवल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने महाराष्ट्रातही आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. बिश्नोईने सलमान खानला (Salman Khan ) धमकावून पैसे उकळण्याच्या उद्देशाने लक्ष्य केले, जेणेकरून तो खंडणीचा धंदा पुढे नेऊ शकेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की आरोपपत्रात बिश्नोईची या प्रकरणात सक्रिय भूमिका कशी आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे जमा केले आहेत.

पोर्तुगालमधून एक फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये ही घटना घडवून आणण्याची जबाबदारी घेण्यात आली होती, असेही आरोपपत्रात उघड झाले आहे. अनमोल बिश्नोई आणि अटक आरोपी यांच्यातील संभाषणाचे 3-5 मिनिटांचे रेकॉर्डिंगही या आरोपपत्रात जोडण्यात आले असून फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान अनमोल बिश्नोईच्या आवाजाचे नमुने जुळल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोपपत्रात सलमान-अरबाजच्या वक्तव्याचाही समावेश

आरोपपत्रात सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. सलमानने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, त्याने काहीही चुकीचे केले नाही, तरीही त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे आणि त्याचा बळी घेतला जात आहे. त्यांना धमकावण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी बिष्णोई हे सर्व करत असल्याचा अभिनेत्याने सांगितले आहे. गेल्या काही वर्षांत बिष्णोई टोळीकडून धमक्या मिळाल्याच्या अनेक घटना त्यांनी सांगितल्या.

भीतीच्या वातावरणात जगत असल्याचे सलमान म्हणाला

बिष्णोई टोळीकडून सततच्या धमक्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांना भीतीच्या वातावरणात राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या धमक्या भडकवण्यासाठी त्याने काहीही केले नसून केवळ त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी या धमक्या दिल्या जात असल्याचा सलमानने दावा केला आहे. त्याने गेल्या काही वर्षांतील अनेक घटनांचे वर्णन केले, ज्यात धमकीचे ईमेल, संदेश, त्याच्या निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या नोट्स आणि त्याच्या घरी गोळीबाराची घटना घडल्या आहेत.

Salman Khan Threat: वसीम चिकनाला पोलिसांकडून अटक; बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड

आरोपपत्रात ठोस फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश

अरबाज खाननेही एक निवेदन दिले, ज्यामध्ये त्याने सांगितले की, भावाला मिळालेल्या या धमक्यांमुळे त्याचे कुटुंब कसे भीतीच्या वातावरणात जगत आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात ठोस डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे आहेत, ज्यात लॉरेन्स बिश्नोई यांनी गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारलेल्या फेसबुक पोस्टचा समावेश आहे.

चार्जशीटनुसार, ही पोस्ट पोर्तुगालमधील अनमोल बिश्नोईने लॉरेन्सच्या सूचनेवरून केली होती. अटक आरोपी विकी गुप्ताच्या मोबाईलवरही ही पोस्ट सापडली आहे. याशिवाय, गुन्हे शाखेला गुप्ताच्या फोनवर 3-5 मिनिटांचे रेकॉर्डिंग देखील सापडले, ज्यामध्ये तो अनमोल बिश्नोईशी बोलत होता आणि सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची योजना आखत होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिश्नोई टोळीने अभिनेता आणि मुंबईतील लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा कट रचला होता, त्याचे पुरावे तपासादरम्यान सापडले आहेत.

आरोपपत्रात बिश्नोई विरुद्ध इतर प्रकरणांचा संदर्भ आहे, ज्यामध्ये त्याच्यावर विविध एजन्सींनी नोंदवलेल्या सुमारे 50-60 खटल्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी, गोळीबार आणि अंमली पदार्थांची तस्करी या आरोपांचा समावेश आहे.

Salman Khan : सिद्धू मुसेवालाप्रमाणेच भाईजानचा ‘गेम’; पोलिसांकडून दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासे

न्यायालयात आरोपपत्र दाखल

सोमवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे. या आरोपपत्रात दोन आरोपींच्या कबुलीजबाबासह 46 साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे. 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणाऱ्या विकी गुप्ता आणि सागर पाल यांच्यासह तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या 6 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अनुज थापन आणि सोनू कुमार बिश्नोई हे अन्य आरोपी असून त्यांनी शस्त्रे पुरवली होती. गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये तपासादरम्यान थापनने आत्महत्या केली होती. इतर आरोपींमध्ये मोहम्मद रफिक चौधरी आणि हरपाल उर्फ ​​हरी यांचा समावेश आहे, ज्यांनी इतरांची काळजी आणि आर्थिक मदत केली.

आरोपपत्रात तीन वाँटेड आरोपींचीही नावे

सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेले लॉरेन्स बिश्नोई, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि रोहित गोद्रा, जे यूएस आणि कॅनडात असल्याचा संशय आहे आणि त्यांच्याकडे कायद्याची अंमलबजावणी टाळण्यासाठी विविध पासपोर्ट आहेत.

follow us