Download App

SaReGaMaPa Lil Champs : सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला

Mann Halve Song: सुरेशजी ( Suresh Wadkar) यांनी दिलेला शब्द पाळला आणि "मन हळवे..." हे गीत रेकॉर्ड करून नुकतचं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.   

Suresh Wadkar Mann Halve Song: सारेगमप लिटिल चॅम्प्सच (SaReGaMaPa Lil Champs) पर्व नुकतेच काही महिन्यांपूर्वी संपलं. त्यात उपविजेती ठरलेली गुणी गायिका श्रावणी वागळे ( Shravani Wagle) हीचं उत्तम गायन ऐकून स्पर्धेतील महागुरू सुरेश वाडकर ( Suresh Wadkar) यांनी तिला एक वचन दिल होत. ते वचन अस होत की मी स्वतः श्रावणी बरोबर एक नवीन गाणं रिकॉर्ड करीन. (Mann Halve Song) बोलल्याप्रमाणे सुरेशजी यांनी दिलेला शब्द पाळला आणि “मन हळवे…” हे गीत रेकॉर्ड करून नुकतचं सोशल मीडियावर (social media) रिलीज करण्यात आला आहे.

सुरेश वाडकर यांनी दिलेला शब्द पाळला

अनेकदा रिॲलिटी शोमध्ये अनेक मोठी लोक स्पर्धकांची गाणी ऐकून अशी वचनं देतात परंतु ती काही वेळा पूर्णत्वास येत नाहीत. परंतु सुरेशजीनी स्वतःहून दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सारेगमप विजेता आणि सध्या सारेगमपचा संगीत संयोजक आणि मार्गदर्शक असलेला गायक आणि संगीतकार अनिरूद्ध जोशी यानी संगीतबद्ध केलेल्या “मन हळवे..” या गाण्यास सुरेश वाडकर आणि श्रावणी वागळे यांनी आवाज दिला आहे तर गाण्याचे शब्द ऋचा मुळे यांचे आहेत.

Suresh Wadkar : ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

गाण्यामध्ये अक्षय आचार्य यानी संगीत संयोजन केले असून, प्रसाद पाध्ये यांनी तबला, वरद कठापुरकर यानी बासरी तर हर्ष भावसार यानी सक्सोफोन वादन केले आहे. हे गाणं नुकतंच आजीवसान च्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिध्द झाले असून गाण्यास रसिकांची पसंती मिळते आहे.

follow us