सायानी गुप्ता हिने iSAFF लीडरशीप इन फिल्म अवार्ड कॅनडा 2026 तसेच आसमानी साठी एक्सेलनेस इन शॉर्ट फिल्म मेकिंग हॉनरनेबल मेन्शन पटकावल !

Sayani Gupta; सायानी गुप्ताचा कॅनडात ‘लीडरशिप इन फिल्म अवॉर्ड’ आणि ‘एक्सलन्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग’साठी ‘ऑनरेबल मेन्शन’ने सन्मान.

Sayani Gupta Leadership in Film Award

Sayani Gupta Leadership in Film Award

Sayani Gupta Leadership in Film Award: सायानी गुप्ताच्या अभिनय कारकिर्दीत आणखी एका आंतरराष्ट्रीय सन्मानाची भर पडली आहे. कॅनडातील इंटरनॅशनल साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल (iSAFF)मध्ये सायानीला ‘लीडरशिप इन फिल्म अवॉर्ड 2026’ने गौरवण्यात आले. यासोबतच तिच्या ‘आसमानी’ या शॉर्ट फिल्मला ‘एक्सलन्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग – ऑनरेबल मेन्शन’ हा सन्मानही मिळाला आहे.

प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट; धीर देत म्हणाले, ‘भावनेच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका’

अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीच्या माध्यमातूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सायानीच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘लीडरशिप इन फिल्म अवॉर्ड’ हा सन्मान तिच्या कॅमेऱ्यासमोरील तसेच कॅमेऱ्यामागील सर्जनशील प्रवासाची दखल घेणारा ठरला आहे.

‘आसमानी’ला मिळालेल्या सन्मानामुळे सायानीच्या आनंदात आणखी भर पडली. या शॉर्ट फिल्मला iSAFFमध्ये ‘एक्सलन्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग – ऑनरेबल मेन्शन’ मिळाले. फिल्म फेस्टिव्हलच्या निवेदनानुसार, ‘आसमानी’ला जगभरातून प्रेक्षकांचे प्रेम आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जेलमधून वाल्मिक कराडने सूत्रे हलवली; बजरंग सोनवणेंनी रेकॉर्डिंग ऐकवली, ‘माझ्या मुलाला विलास घुले प्रकरणात अडकवण्याचा कट’

iSAFF Honours Night & Red Carpet सोहळ्यात हे दोन्ही सन्मान प्रदान करण्यात आले. 23 सप्टेंबर 2026 रोजी व्हॅन्कुव्हर येथे हा सोहळा पार पडला. याच वर्षाच्या सुरुवातीला सायानीला Harvard University SAA कडून ‘South Asian Person of the Year’ हा सन्मानही मिळाला होता.

या आंतरराष्ट्रीय सन्मानांमुळे सायानी गुप्ताचा भारतीय कथाकथनाला जागतिक व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे. अभिनयासोबतच कॅमेऱ्यामागील तिच्या सर्जनशील कामाचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.

‘नवं कर्ज घेऊ नका, 3 वर्षांचा खर्च बाजूला ठेवा’; राहुल गांधींच्या गुंतवणूक सल्लागाराचा मोठा सल्ला

दरम्यान, ‘आसमानी’चे पुढील कॅनडा स्क्रीनिंग IFFSA, टोरोंटो येथे होणार आहे. या स्क्रीनिंगसाठी सायानी गुप्ता मुख्य पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे.

Exit mobile version