Download App

रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ मधील दुसरं गाणं ‘बर्बाद’ प्रदर्शित; सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स

Mohit Suri : यश राज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांच्या आगामी रोमँटिक चित्रपट 'सैयारा' मधील दुसरं गाणं 'बर्बाद' (Barbad) आज

  • Written By: Last Updated:

Mohit Suri : यश राज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांच्या आगामी रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ मधील दुसरं गाणं ‘बर्बाद’ (Barbad) आज प्रदर्शित झालं आहे. हे गाणं गायलं आहे लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) यांनी आणि याचे बोल व संगीत दिलं आहे ‘द ऋष’ यांनी. ‘सैयारा’ चा टीझर आल्यानंतरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

वायआरएफ आणि मोहित सूरी दोघेही प्रेमकथांसाठी प्रसिद्ध एकत्र येणं हीच एक विशेष गोष्ट आहे. नवोदित कलाकारांच्या केमिस्ट्री आणि अभिनयालाही भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. मोहित सूरी सांगतो ,”प्रत्येक पिढीत काही गायक असे असतात, जे प्रेमगीतांची खरीखुरी ओळख बनतात. आजच्या पिढीसाठी जुबिन नौटियाल ही तीच ओळख आहे.

मला सुरुवातीपासूनच माहित होतं की ‘सैयारा’च्या अल्बममध्ये एक रोमँटिक सॉन्ग असेल जो जुबिन गाईल, आणि ‘बर्बाद’ त्याच्यासाठी परफेक्ट होता.” तो पुढे म्हणाला की,”जुबिनच्या आवाजात एक खास भावना आहे जी प्रेमगीतांना अधिक खोल आणि परिणामकारक बनवते. ही एक दुर्मीळ कला आहे. म्हणूनच असे गायक मोठे स्टार बनतात. जर एखादा गायक असा गाणं गाऊ शकतो ज्याशी लोक स्वतःला जोडू शकतात, तर ती एक आशीर्वादासारखी गोष्ट आहे.”

मोहित सूरी यांच्या मते, “‘बर्बाद’ गाणं अशा प्रत्येकासाठी आहे ज्यांनी कधी ना कधी प्रेम अनुभवलं आहे. या गाण्यातून प्रेमाचं वेड, वेदना आणि अधुरी ओढ दाखवली गेली आहे.” ‘सैयारा’ या शीर्षकाचे विशेष महत्त्व आहे. हे एक भटकतं आकाशगंगेतील ताऱ्याचं रूपक आहे. तेजस्वी, पण गूढ आणि नेहमीच थोडंसं दूर.

War 2 मध्ये एनटीआर ला मशीनसारखा दाखवणं गरजेचं होतं; अनाइता श्रॉफ अदजानिया

या चित्रपटातून अहान पांडे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत, आणि त्यांच्या समोर असणार आहे अनीत पड्डा, जिने ‘बिग गर्ल्स डोंट क्राई ’ या मालिकेत अप्रतिम अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘सैयारा’ हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

follow us