Download App

Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ( Seema Deo passed away) यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनावर विविध क्षेत्रामधून दुःख व्यक्त केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ यांच्या पासून सुप्रीया सुळे, अभिनेते अशोक सराफ

भारतीय कुस्तीला मोठा धक्का; जागतिक पातळीवर कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित

सीमा देव यांचे निधन चटका लावणारे…

चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव (Seema Deo passed away) यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती.

Rajkummar Rao Look: ‘गन्स अँड गुलाब’चा अभिनेता राजकुमार रावच्या लूकने जिंकली प्रेक्षकांची मन!

पुढे ते म्हणाले की, पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहीले आहेत. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo passed away) यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

अभिनयाची जाण असलेली शालीन अभिनेत्री…

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo passed away) यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. चित्रपटांमध्ये त्यांनी दिर्घकाळ चांगलं काम केलं. त्यांच्या जाण्याने सर्व महाराष्ट्राला खूप दुःख झाले आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याच बरोबर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही देव यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच जाणं एक वाईट गोष्ट आहे. एक सुंदर आणि अभिनयाची जाण असलेली एक शालीन अभिनेत्री गेली. त्यांच्या जोडीने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. असं म्हणत अशोक सराफ यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags

follow us