देशांतर्गत वादाचा भारतीय कुस्तीला मोठा धक्का; जागतिक पातळीवर कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित

देशांतर्गत वादाचा भारतीय कुस्तीला मोठा धक्का; जागतिक पातळीवर कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून वादात अडकलेल्या भारतीय कुस्तीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. कुस्ती महासंघाची निवडणूक न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (The United World Wrestling has indefinitely suspended the membership of the Wrestling Federation of India)

दरम्यान, यानंतर आता भारतीय कुस्तीपटूंना आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ध्वजाखाली स्पर्धेत भाग घेता येऊ शकणार नाही. येत्या 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रताच्या जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना ‘तटस्थ खेळाडू’ म्हणून भाग घ्यावा लागणार आहे. भारताला आणि भारतीय कुस्तीपटूंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

World Cup 2023 : वर्ल्डकपआधी सरावाचा पेपर; टीम इंडिया ‘या’ दोन संघांना भिडणार

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 7 मे रोजी होणार होती. पण क्रीडा मंत्रालयाने ही प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर निवडणुका अनेकवेळा लांबल्या. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाला 30 मे रोजी पत्र लिहून येत्या 45 दिवसांत (15 जुलैपर्यंत) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यास, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित करेल, असा इशारा दिला होता.

काय आहे वाद?

भारतीय महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI अर्था रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) पदाधिकाऱ्यांचे निलंबिन करून भूपेंद्र सिंग बाजवा यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅडव्होक कमिटीची स्थापना केली. तर जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एमएम कुमार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या समितीने 11 जुलैला भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक नियोजित केली.

पण त्याचवेळी आसाम कुस्तीगीर संघटनेने त्यांच्या मान्यतेचा मुद्दा उचलून धरत आसाम उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली. या स्थगितीनंतर अ‍ॅडव्होक कमिटीने आसाम कुस्तीगीर संघटनेला मान्यता दिली. यानंतर निवडणुकीसाठी 12 ऑगस्ट ही नवी तारीख निश्चित करण्यात आली. मात्र 11 ऑगस्टला दीपेंदर हुड्डा समर्थित हरियाणा कुस्ती संघटनेने हरियाणा उच्च न्यायालयातून निवडणुकाली स्थगिती आणली आहे.

भारताच्या चंद्र विजयानंतर मुंबई इंडियन्सचं खास ट्विट; ‘वर्ल्डकप’साठी जोडलं 2019 चं कनेक्शन!

WFI मध्ये 15 पदांसाठी होणार होती निवडणूक :

WFI मध्ये 15 पदांसाठी 12 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार होती. यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांच्यासह 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दिल्लीतील ऑलिम्पिक भवनात हे अर्ज दाखल करण्यात आले होते. यात सरचिटणीस पदासाठी चंदीगड रेसलिंग बॉडीचे दर्शन लाल यांनी अर्ज दाखल केले होते. तर उत्तराखंडच्या एसपी देसवाल यांनी खजिनदार पदासाठी अर्ज दाखल केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube