World Cup 2023 : वर्ल्डकपआधी सरावाचा पेपर; टीम इंडिया ‘या’ दोन संघांना भिडणार
World Cup 2023 : आयसीसी विश्वकप स्पर्धेचा (World Cup 2023) थरार ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याआधी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेतील मुख्य सामन्यांआधी 10 सराव सामने होतील असे आयसीसीने म्हटले आहे. टीम इंडियाचे (Team India) दोन सराव सामने आहेत. इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन संघाविरुद्ध भारतीय संघाचा सराव पेपर असेल. 30 सप्टेंबर रोजी इंग्लंड आणि 3 सप्टेंबरला तिरुअनंतपूरम येथे नेदरलँड्स विरुद्ध सामना होईल.
चांद्रयानाच्या यशानंतर आणखी एक गुडन्यूज! भारताने आयर्लंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली
ऑक्टोबरमध्ये मुख्य विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. भारतातील तीन शहरांत हे सामने होतील. गुवाहाटी, तिरुअनंतपूरम आणि हैदराबाद येथे हे सामने होणार आहेत. साखळी फेरीतील तीन सामने हैदराबाद येथे होतील. याच मैदानावर पाकिस्तानचा 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्स विरोधात सामना होणार आह. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे.
असे आहे सराव सामन्यांचे वेळापत्रक
सराव सामन्यांच्या वेळापत्रकात पहिला सामना 29 सप्टेंबर रोजी बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका असा होईल. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना होईल. त्याच दिवशी तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. 30 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात होईल. 2 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असे सामने होतील. 3 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, भारत विरुद्ध नेदरलँड्स आणि तिसरा सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होईल.
भारताच्या चंद्र विजयानंतर मुंबई इंडियन्सचं खास ट्विट; ‘वर्ल्डकप’साठी जोडलं 2019 चं कनेक्शन!
भारताने आयर्लंडविरुद्धची मालिका जिंकली
भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मालिकेतील हा अंतिम सामना होता. त्यामुळे टीम इंडियाने (Team India) ही मालिका जिंकली आहे.