Download App

Shah Rukh Khan: किंग खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; दिवाळीच्या मुहूर्तावर ‘डंकी’चं नवं पोस्टर रिलीज

Shah Rukh Khan Release Dunki New Poster : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला असून चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरला आहे. चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. अशातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2023) ‘डंकी’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.


किंग खानच्या ‘डंकी’ या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासंबंधित नवीन अपडेट समोर आली आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे. किंग खानने ‘डंकी’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये किंग खान स्कूटरवर बसलेला दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्न आणि विक्रम कोचर देखील अबघ्याला मिळत आहे. तर त्यांचा तिसरा मित्र सायकलवर बसल्याचे बघायला मिळत आहे.

डंकी’ सिनेमाचं पोस्टर किंग खानने शेअर केलं आहे. या पोस्टवर “आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करा”, असं लिहिल्याचे दिसत आहे. पोस्टर शेअर करत असताना किंग खानने लिहिलं आहे की, कुटुंबाशिवाय दिवाळी कशी साजरी होणार? नव्या वर्षाची सुरुवात कशी होणार? एकत्र असण्यात आणि एकत्र सण साजरे करण्यात खरी मजा आहे. ‘डंकी’चं एक वेगळं विश्व आहे.

Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

किंग खानच्या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, डंकी’ नक्कीच एक कोटींचा गल्ला कमावणार आहे, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की, मित्रांची गोष्ट चाहत्यांना नक्कीच आवडेल, जवान आणि पठाणचा रेकॉर्ड मोडणार डंकी, किंग खानच्या डंकीची प्रतीक्षा, अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणात चाहते करत आहेत.

किंग खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या दोन्ही सिनेमांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे. ‘डंकी’ हा सिनेमा नाताळाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. 22 डिसेंबर 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us