Oh Maahi Song Release: शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie ) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी किंग खानने त्याच्या चित्रपटातील नवीन गाणे रिलीज केले आहे. ‘ओह माही’ (Oh Maahi Song ) असे या गाण्याचे नाव असून त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू (Taapsee Pannu) दिसत आहे. रोमान्सचा बादशाह अशो ओळख असणारा शाहरुख या गाण्यात देखील रोमँटिक स्टाईलमध्ये तापसीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
डंकी चित्रपटातील हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. गीतलेखन इर्शाद कामिल यांनी केले असून संगीत प्रीतम यांनी दिले आहे. गाण्याचा सूर कानाला सुखावणारा आणि मनाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या चित्रपटाचे हे तिसरं गाणं आहे. याआधी निर्मात्यांनी आणखी दोन गाणीही रिलीज केली आहेत.
डंकीच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ पहा
डंकीच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकणार आहात. शाहरुख आणि तापसी वाळवंटात प्रवास करताना दिसत आहेत. शाहरुख राईडवरून खाली उतरतो आणि तापसीवर तिचे प्रेम व्यक्त करत आहे. याआधी या चित्रपटाच्या दोन गाण्यांचे नाव ‘लूट पुट गया’ आणि ‘निकले दी कभी हम घर से था’ असे होते. या दोन्ही गाण्यांना रसिकांनी भरभरून प्रेम दिले.
Musafira Movie: मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग रिलीज, एकदा पाहाच
काय म्हणाला शाहरुख खान?
शाहरुखनेही हे गाणे एक्स (ट्विटर) च्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहे. पोस्ट करताना त्यांनी लिहिले, “प्रेम, इश्क, मोहब्बत, प्यार… हे सर्व व्यक्त करण्यासाठी आम्ही येत आहोत. अनेक वेळा संधी मिळत नाही. काहीवेळा आपण शब्दांची कमतरता अनुभवतो. हे गाणे त्या सर्व रसिकांना समर्पित आहे ज्यांना असे वाटते. म्हणून म्हणा, आत्ता, आज, उद्या आणि दररोज, माझे प्रेम तुझे आहे, पहा, मी शेवटपर्यंत तुमचा आहे. काय गाणे आहे! माझ्या प्रिय मित्रांनो, हे गाणे तुमचे प्रेमगीत बनवा.
मात्र, हा चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि बोमन इराणी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.