Musafira Movie: मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग रिलीज, एकदा पाहाच

Musafira Movie: मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग रिलीज, एकदा पाहाच

Musafira Movie Title Song Released: ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय सिनेमा. (Musafira Movie) खरंतर सिनेमाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र जोरदार चर्चा होती. (Marathi Movie) एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे सिनेमाची तगडी स्टारकास्ट. (Musafira Movie Song) यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)


यावेळी एका शानदार सोहळ्यात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा मराठी सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या बिग बजेट सिनेमात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

‘मैत्री’ हा विषय कायम प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजत असतात. ‘मुसाफिरा’ ही असाच मैत्रीवर बेतलेला सिनेमा आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे.

सिनेमाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात की, ” स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय सिनेमाचा मान ‘मुसाफिरा’ला मिळाला आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा सिनेमा केवळ तरुण पिढीसाठी मर्यादित नसून हा सिनेमा प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा मराठी सिनेमा जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे.

Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’च्या पोस्टरचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण

आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे. यात मैत्री आहे, धमाल आहे, भावनिक बंध आहेत आणि भांडणेही आहेत. कलाकारही उत्तम आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा मराठीमध्ये पदार्पण करत आहे. ‘मुसाफिरा’ चाहत्यांना मैत्रीची सुंदर सफर घडवणार, हे नक्की !” मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube