Health Update: आता कशी आहे किंग खान याची तब्येत? जवळच्या मैत्रिणीने दिली हेल्थ अपडेट

Shah Rukh Khan: शाहरुख खान याची तब्येत आता कशी याची माहिती त्याची सहकलाकार आणि कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने दिली आहे.

Health Update: आता कशी आहे किंग खान याची तब्येत? जवळची मैत्रिणीने दिली हेल्थ अपडेट

Health Update: आता कशी आहे किंग खान याची तब्येत? जवळची मैत्रिणीने दिली हेल्थ अपडेट

Shah Rukh Khan Health Update: काल बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) प्रकृती खालावली होती. उष्माघातानंतर त्यांना अहमदाबाद (Ahmedabad) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांना अभिनेत्याच्या तब्येतीची चिंता लागली होती. आता त्याची खास मैत्रिण आणि अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने किंग खानच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट दिले आहे.

शाहरुख खानची तब्येत आता कशी आहे?

अभिनेत्री जुही चावलाने सांगितले आहे की, शाहरुख खानची तब्येत आता सुधारत आहे आणि त्याला बरे वाटत आहे. शाहरुखसोबत जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हे देखील आयपीएल टीम केकेआरचे सह-होस्ट जर्त आहेत. काल संध्याकाळी जूही तिच्या ब्लू सेडानमध्ये केडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसली. त्यावेळी रुग्णालयाबाहेर पडताना याबद्दल माहिती दिली आहे.

न्यूज 18 शी बोलताना जुही म्हणाली की, “काल रात्री शाहरुखची तब्येत ठीक नव्हती, पण त्याची काळजी घेतली जात आहे आणि आता त्याला बरे वाटत आहे. देव इच्छेने, तो लवकरच उठेल आणि जेव्हा आम्ही अंतिम सामना खेळू तेव्हा वीकेंडला स्टँडमध्ये संघाचा जयजयकार करायला नक्कीच आमच्यासोबत असेल.


आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुख खानची प्रकृती खालावली

IPL 2024 कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान, अभिनेत्याला उष्माघातामुळे केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुखने त्याची लाडकी लेक सुहाना आणि अबराम आणि मॅनेजर पूजा ददलानीसोबत मॅचला हजेरी लावली.

Shah Rukh Khan: मोठी बातमी! शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

गौरी खाननेही तातडीने केडी हॉस्पिटल गाठले

शाहरुखला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी ऑनलाइन समोर येताच तिची पत्नी गौरी खानही केडी हॉस्पिटलमध्ये पोहोचताना दिसली. दरम्यान, अभिनेत्याची लेक सुहाना खान जवळच्या मैत्रिणी अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नंदासोबत मुंबईला परतली आणि खाजगी विमानतळावर स्पॉट झाली.

Exit mobile version