Shah Rukh Khan Accident: अभिनेता शाहरुख खान हणजेच किंग खानला (Shah Rukh Khan) हा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शूटिंगच्या दरम्यान गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात किंग खानच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर किंग खानच्या नाकाची शस्त्रक्रिया देखील करावी लागली आहे. किंग खानच्या नाकाला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता, नंतर रक्तस्त्राव थांबण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.
Breaking News: Bollywood superstar Shah Rukh Khan (@iamsrk) meets with accident on Los Angeles set, undergoes surgery. Reports suggest he injured his nose during filming and was rushed to the hospital. Wishing SRK a speedy recovery! #ShahRukhKhan #Accident #emeutes #4thofJuly pic.twitter.com/18Raskqf4m
— Sagar jaiswal (@SagarKu88946146) July 4, 2023
मिळालेल्या माहितीनुसार किंग खानच्या लॉस एंजेलिसमधील एका प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. तिथे त्याला नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता, त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी किंग खानच्या टीमला सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली आहे. किंग खान भारतात परतला आला आहे, तो या दुखापतीतून सावरत आहे, असं सांगितले जात आहे. किंग खानच्या टीमकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
किंग खानचा नुकतेच इंडस्ट्रीमध्ये ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. जवळपास ४ वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने ‘पठाण’ या सिनेमातून कमबॅक केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्याचा ‘जवान’ हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जवान या सिनेमात किंग खानसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शिवाय ‘डंकी’ हा सिनेमा सुद्धा प्रदर्शनाच्या मोठ्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये तो तापसी पन्नूसोबत भूमिका साकारणार आहे.