Dunki Box Office Collection Day 5: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींचा व्यवसाय केला. (Box Office Collection) चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस उलटले असून पाचव्या दिवशी या चित्रपटाने एकूण 22.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. (Dunki Box Office Collection ) त्यानंतर ‘डंकी’चे एकूण कलेक्शन 128.13 कोटी झाले आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ या चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. हा चित्रपट डंकीच्या एका दिवसानंतर प्रदर्शित झाला होता, परंतु बॉक्स ऑफिसवर तो त्याच्यापेक्षा खूप पुढे गेला आहे. ‘डंकी’ने पहिल्याच दिवशी जवळपास 29 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा आणखी कमी झाला आणि चित्रपट फक्त 20 कोटींवर घसरला.
तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 25.61 कोटींचा व्यवसाय केला आणि चौथ्या दिवशी ‘डंकी’ने सर्वाधिक कमाई केली. चित्रपटाचे दिवसभराचे कलेक्शन 30.7 कोटी रुपये होते. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘डंकी’ने पाचव्या दिवशी 22.50 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 128.13 कोटी झाले आहे.
थांबायचं नाय गड्या…प्रभासच्या ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर जादू; चौथ्या दिवशी कलेक्शन झालं तरी किती?
शाहरुख खानचा ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसला तरी या वर्षातील त्याच्या इतर दोन चित्रपटांनी अनेक विक्रम मोडले आहेत. किंग खानच्या ‘पठाण’ने वर्षाची सुरुवात चांगली केली होती. सोबतच ‘जवान’ चेही रेकॉर्ड तोडून कमाई केली. किंग खानचा हा चित्रपट कमाईच्या बाबतीत त्या दोन चित्रपटांना टक्कर देऊ शकणार नाही, पण प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे.
‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शाह, विकी कौशल आणि विक्रम कोचर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.