थांबायचं नाय गड्या…प्रभासच्या ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर जादू; चौथ्या दिवशी कलेक्शन झालं तरी किती?

थांबायचं नाय गड्या…प्रभासच्या ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर जादू; चौथ्या दिवशी कलेक्शन झालं तरी किती?

Salaar Box Office Collection Day 4: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. (Salaar Box Office Collection) हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदीसह पाच भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. (Box Office) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 100 कोटींची कमाई केली होती. आता चार दिवसांनंतर चित्रपटाने एकूण 255.54 कोटींची कमाई केली आहे. आणि जगभरातील कलेक्शनबद्दल बोललो तर चित्रपटाने 402 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)


‘सालार’ हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 90.7 कोटींचा व्यवसाय केला. त्यापैकी सर्वाधिक व्यवसाय तेलुगू राज्यातून झाला आहे. या चित्रपटाने तेलगूमध्ये 66.75 कोटी रुपये, मल्याळममध्ये 3.55 कोटी रुपये, तामिळमध्ये 3.75 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.9 कोटी रुपये आणि हिंदीमध्ये 15.75 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे.

दुसऱ्या दिवशी चित्रपटाने एकूण 56.35 कोटींचा व्यवसाय केला. त्यापैकी तेलगूमध्ये 34.25 कोटी रुपये, मल्याळममध्ये 1.75 कोटी रुपये, तामिळमध्ये 3.05 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.95 कोटी रुपये आणि हिंदीमध्ये 16.35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 62.05 कोटींचा व्यवसाय केला. त्यापैकी तेलगूमध्ये 35 कोटी रुपये, मल्याळममध्ये 1.55 कोटी रुपये, तामिळमध्ये 3.2 कोटी रुपये, कन्नडमध्ये 1.2 कोटी रुपये आणि हिंदीमध्ये 21.1 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

Box Office Collection: ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर धूम! 3 दिवसांतच पार केला 200 कोटींचा टप्पा

चौथ्या दिवशीही चित्रपटाचे कलेक्शन चांगले राहिले. या चित्रपटाने एकूण 45.77 कोटींचा व्यवसाय केला. यामध्ये चित्रपटाने तामिळमधून 27.01 कोटी, मल्याळममधून 1.3 कोटी, तमिळमधून 2.1 कोटी, कन्नडमधून 0.86 कोटी, हिंदीतून 14.5 कोटी कमावले आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी आतापर्यंत 0.67 कोटींची कमाई केली आहे.

शाहरुख खानच्या ‘डंकी’सोबत प्रभासचा ‘सालार’ रिलीज झाला. या चित्रपटाने शाहरुख खान स्टाररला ऍडव्हान्स तिकीट बुकिंगच्या बाबतीत मागे टाकले आणि आता ओपनिंग डे कलेक्शनमध्ये ‘सालार’, ‘डंकी’ला मागे टाकले आहे. डंकीने पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींचा व्यवसाय केला होता, तर चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube