Download App

Box Office: दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, सहाव्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई

Dunki Box Office Collection Day 6: हे वर्ष बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) खूप लकी ठरले आहे. 2023 मध्ये तो चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. त्यानंतर ‘जवान’ही सुपरहिट ठरला. त्याचा ‘डंकी’ (Dunki Movie) नवीन वर्षाच्या आधी रिलीज झाला आणि तो चांगला व्यवसाय करत आहे.


‘डंकी’ 21डिसेंबरला प्रदर्शित झाला. किंग खानच्या इतर दोन चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील उत्तम ओपनिंग करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा होती, परंतु या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 29.2 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले आहेत आणि आतापर्यंत चित्रपटाने भारतात सुमारे 140.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘डंकी’ने पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात आणखी घसरण झाली. या चित्रपटाने केवळ 20.12 कोटींचा व्यवसाय केला. मात्र, तिसऱ्या दिवशी शनिवारी किंग खान स्टारर चित्रपटाला फायदा झाला आणि चित्रपटाने 25.61 कोटींची कमाई केली.

New Marathi Song: काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’ ‘लावण्यवती’ अल्बमचे अखेरचे गाणे भेटीला

चौथा दिवस रविवार होता, त्यामुळे मोठ्या संख्येने चाहते चित्रपट पाहण्यासाठी आले आणि या दिवशी चित्रपटाने 30.7 कोटींचा व्यवसाय केला. पाचव्या दिवशी चित्रपटाने 24.32 कोटींची कमाई केली आणि सहाव्या दिवशी चित्रपटाने केवळ 10.25 कोटींची कमाई केली.

शाहरुख खानचा हा चित्रपट प्रभास स्टारर ‘सालार’ या चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. ‘सालार’ ‘डंकी’च्या एका दिवसानंतर प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘डंकी’पेक्षा जास्त कमाई केली. पाच दिवसांत सालारने भारतात 270 दशलक्षाहून अधिक व्यवसाय केले आहे.

follow us