Download App

Dunki Teaser: शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘डंकी’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Shah Rukh Khan Dunki Teaser Release: बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी (Shah Rukh Khan) चाहत्यांना सरप्राईज मिळालं आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘डंकी’चा धमाकेदार टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर (Social Media) मोठा धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे.

किंग खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. त्याचा ‘पठाण’ (Pathaan) आणि ‘जवान’ (Jawan) हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीला आले असून हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला आहे. आता अभिनेत्याच्या आगामी ‘डंकी’ या सिनेमाची (Shah Rukh Khan Upcoming Movie) चाहत्यांना खूपच प्रतीक्षा करावी लागत आहे. टीझर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची मोठी उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘डंकी’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर शेअर करत असताना किंग खानने लिहिलं आहे की, “स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या साध्या आणि वास्तविक लोकांची गोष्ट. मैत्री, प्रेम आणि नातं म्हणजेच कुटुंब. हृदयस्पर्शी कथाकाराची हृदयस्पर्शी कथा. या प्रवासाचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आमच्यासोबत असाल. येत्या नाताळामध्ये ‘डंकी’ जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

IFFI: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सरकारकडून 3 मराठी सिनेमाची घोषणा

किंग खानचा आगामी ‘डंकी’ हा सिनेमा धमाकेदार रिलीज आधीपासूनच जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात तापसी पन्नू आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत चाहत्यांना बघायला मिळणार आहेत. ‘डंकी’ हा बहुचर्चित सिनेमा 21 डिसेंबर 2023 दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘डंकी’ या सिनेमाला U सर्टिफिकेट मिळाले आहे. ‘डंकी’ या सिनेमात किंग खानआणि तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेमध्ये मनोरंजन करताना दिसणार आहेत.

Tags

follow us