Download App

Shah Rukh Khan: शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर; अभिनेत्याने आगामी चित्रपटाबाबत दिली मोठी माहिती

Shah Rukh Khan New Film: 2023 साली शाहरुख खानने (Shah Rukh Khan) केलेला धमाका हा भारतीय चित्रपटसृष्टीचा मोठा विक्रम आहे.

Shah Rukh Khan New Film: 2023 साली शाहरुख खानने (Shah Rukh Khan) केलेला धमाका हा भारतीय चित्रपटसृष्टीचा मोठा विक्रम आहे. आधी ‘पठाण’(Pathan), मग जवान आणि मग ‘डंकी’ आणले. हे तिन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि एकाच वर्षात 500 कोटी रुपयांचे तीन चित्रपट देणारा शाहरुख हा एकमेव अभिनेता ठरला. या तिन्ही चित्रपटांमधून त्याने एका वर्षात 2650 कोटींहून अधिक कमाई केली होती. तेव्हापासून त्याचे सर्व चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.


सध्या शाहरुख आयपीएलमध्ये (IPL) व्यस्त आहे आणि त्याच्या टीम केकेआरला सपोर्ट करताना दिसत आहे. दरम्यान, स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या पुढील चित्रपटाबाबत मोठी माहिती दिली आहे. तो म्हणाला, “मला वाटले की थोडी विश्रांती घ्यावी. मी दोन ते तीन चित्रपट केले आणि तिन्ही चित्रपटांमध्ये भरपूर शारीरिक श्रम होते. म्हणून, मी म्हणालो की मी थोडा वेळ काढेन आणि मी संपूर्ण संघाला सांगितले की मी सामना पाहण्यासाठी येईन, अशी प्रतिक्रिया यावेळी अभिनेत्यांनी दिली आहे.

शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल काय म्हणाला?

तो पुढे म्हणाला, “चांगली गोष्ट म्हणजे माझे शूटिंग जुलै किंवा ऑगस्टमध्ये होणार आहे. आम्ही जूनमध्ये याचे नियोजन करत आहोत, त्यामुळे शूटिंग जूनमध्येही सुरू होऊ शकते. तोपर्यंत मी पूर्णपणे मोकळा आहे. त्यामुळे मला घरच्या सर्व सामन्यांना यायला आवडेल, कारण मला इथे (ईडन गार्डन्स) यायला आवडते.

‘BMCM’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा 23 व्या दिवशी किती झाली कमाई

शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगबद्दल माहिती दिली, मात्र तो कोणता चित्रपट असणार आहे हे सांगितले नाही. पण, त्याचा आगामी चित्रपट ‘किंग’ असणार आहे. ज्यातून त्याची लेक सुहाना रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी सुहाना झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चीज’ चित्रपटात दिसली होती. आणि आता ‘किंग’ 2025 मध्ये रिलीज होऊ असल्याची चर्चा सुरु आहे.

follow us