Pathan : सातव्या वीकेंडमध्येही ‘पठाण’ची छप्परफाड कमाई…

Pathan : सातव्या वीकेंडमध्येही ‘पठाण’ची छप्परफाड कमाई…

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा पठाण चित्रपट जगभरातला नंबर वन हिंदी चित्रपट बनला आहे. पठाणने सातव्या वीकेंडमध्येही चांगलीच कमाई केली आहे. पठाणमध्ये बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि दिपीकाने मुख्य भूमिका साकारलीय. चित्रपट प्रदर्शित होऊन सात आठवडे झाले तरीही पठाण चित्रपटाची चांगलीच कमाई होत आहे. सातव्या वीकेंडमध्ये 1.73 कोटी रुपयांची कमाई केलीय.

10 वी पास ते पदवीधारकांसाठी पुणे महानगरपालिकेत 320 पदांसाठी मेगाभरती

शुक्रवारी पठाण चित्रपटाच्या भारतात 0.31 कोटी रुपयांची कमाई होती. तर शनिवारी 0.61 कोटी तसेच रविवारी 0.81 कोटी रुपयांचं कलेक्शन पठाणनने केलं आहे.

पठाण चित्रपटाने आत्तापर्यंत फक्त परदेशात $47.54 दशलक्ष रुपयांची कमाई केल्याची नोंद करण्यात आली असून भारतात नेट कलेक्शन 539.74 कोटी इतक झालं आहे.

10 वी पास ते पदवीधारकांसाठी पुणे महानगरपालिकेत 320 पदांसाठी मेगाभरती

दरम्यान, हिंदी भाषेतील पठाण या चित्रपटाने सातव्या आठवड्यात 1. 70 कोटी तर इतर सर्व डब आवृत्या 0.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चांगलाच चर्चेत आला होता.

अनेकांनी चित्रपटाला विरोधही केला होता. पठाण बॉक्स ऑफिसवर टिकेल की नाही? याबाबत शंका-कुशंका व्यक्त केली जात होती. मात्र, सातव्या आठवड्यातही पठाणने चांगलीच कमाई केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube