म्हात्रे-सुर्वेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर अजित पवार म्हणाले; ‘त्यामागे….’

म्हात्रे-सुर्वेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर अजित पवार म्हणाले; ‘त्यामागे….’

मुंबई : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियारव व्हायरल होत आहे. म्हात्रे यांनी आपला व्हिडिओ मार्क करुन व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. या व्हायरल व्हिडिओवरून गेल्या काही तासांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज विधानसभेतही याच व्हिडिओवर चर्चा झाली. भाजप आमदार मनिषा चौधरी, यामिनी जाधव यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडून म्हात्रे यांच्या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली. नाहीतर म्हात्रेचं आयुष्य या प्रकरणात बरबाद होईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या प्रकरणी आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करतांना स्वत:चं चारित्र्य चांगलं ठेवणं गरजेचं असतं. कारण लोक आपल्या आमच्याकडे पब्लिक फिगर म्हणून पाहतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात. मतमतांतर असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही. मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसतांना कुणी मुद्दाम असे प्रकार केले. हे लाजीरवाण आहे. त्यामागे कुणी मास्टरमाईड असेल , तर त्याची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिज, असं त्यांनी सांगिलतं.

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओचा मद्दा महिला आमदारांनी आज विधिमंडळात उचलून धरला होता. सीएम एकनात शिदें यांच्या उपस्थित महिला आमदारांनी या व्हिडिओमागे मास्टरमाईंड कोण आहे? त्याला शोधून काढा आणि कारवाई करा, अशी मागणी केली. STI चौकशी करण्याची मागणी भारती लव्हेकर यांनी केली. त्या म्हणाल्या विरोधी पक्षनेत्यांनी महिला धोरणाविषयी सभागृहात जोरदार चर्चा केली. मग ते आता गप्प का आहेत? त्यांनीही या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी करावी, असं त्या बोलल्या. त्यावर अजित पवारांनी याची चौकशी केली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि नेमका प्रकार काय आहे, हे सभागृहासमोर आलं पाहिज, असं सांगितलं.

सोशल मीडियावर म्हात्रे आणि सर्वे यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मार्फ केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. यामागे ठाकरे गटाच पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचं त्यांनी सांगिलतं. दरम्यान, या व्हिडिओ संदर्भात म्हात्रे यांनी काल दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं.

Naatu Naatu wins Oscar | RRR चित्रपटाने रचला इतिहास 

दरम्यान, आता या व्हायरल व्हिडिओची चर्चा विधिमंडळातही झाल्यानं सरकार या व्हिडिओच्या चौकशीसाठी काय निर्णय, आणि या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube