Download App

Shah Rukh Khan: हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या सवालावर किंग खानने केला खुलासा; म्हणाला…

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) हे वर्ष खूप खास ठरला आहे. किंग खानचे सलग दोन सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) ब्लॉगबस्टर ठरले आहेत. ‘पठान’ने देशभरात १ हजार कोटीचा गल्ला कमावला आहे, तर ‘जवान’ (Jawan) देखील आता त्याच दिशेने वाटचाल होत असल्याचे दिसत आहे.


आतापर्यंत या सिनेमाने जगभरात ७०० कोटींचा व्यवसाय केल्याचे सांगितले जात आहे. या दोन सिनेमामधून किंग खानने पुन्हा एकदा तोच बॉलिवूडचा किंग असल्याचे सिद्ध केल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच किंग खानचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तो हॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल प्रतिक्रिया देत असल्याचे बघायला मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

त्या व्हायरल व्हिडिओत किंग खानला हॉलिवूड (Hollywood) सिनेमात काम करण्याबद्दल सवाल करण्यात आला होता. त्यावर उत्तर देत असताना किंग खान म्हणाला आहे की, ‘माझे इंग्रजी चांगले नाही, मला इंग्रजी नीट येत नसल्याने मला ते मूर्ख व्यक्तीची भूमिका करायला सांगणार. मी ४२ वर्षांचा आहे, मी थोडा सावळा देखील आहे. अभिनेता म्हणून माझा काही खास गोष्टी नाही. एक अभिनेता म्हणून माझ्याकडे अनेक वेगवगळे विशेष कौशल्य आहेत.

Sultan Of Delhi Trailer: मौनी रॉयच्या ‘सुलतान ऑफ दिल्ली’ या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

तसेच मला कुंग फू येत नाही, आणि लॅटिन किंवा साल्सा नृत्य येत नसल्यचे त्याने यावेळी सांगितले आहे. तसेच पुढे तो म्हणाला आहे की, मी खूप उंच देखील नाही. मला असे वाटते की माझ्या वयामधील व्यक्तीला हॉलिवूडमध्ये जागा नाही. मी तितका प्रतिभावान आहे, असे मला वाटत नसल्यचे त्याने यावेळी सागितल्याचे बघायला मिळत आहे. मला देशामध्ये आणखी अनोखं काम करायला नक्कीच आवडणार आहे. मला भारतीय सिनेमा जगाभरात न्यायचे आहे, हेच माझे स्वप्न आहे,’ अशी प्रतिक्रिया किंग खानने यावेळी दिली.

किंग खानच्या उत्तराने तेव्हा देखील चाहत्यांची मने जिंकली होती आणि आज देखील हा व्हिडिओ बघून चाहते किंग खानचे तोंड भरून कौतुक करत आहे. खर तर किंग खानचे फक्त भारतात नाही, तर जगभरामध्ये लाखो-करोडो चाहते आहेत. ‘पठान’नंतर आता किंग खानने ‘जवान’मधून मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘डंकी’ राजू हिरानीबरोबर आहे. या सिनेमाबद्दल देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहे.

Tags

follow us