Sultan Of Delhi Trailer: मौनी रॉयच्या ‘सुलतान ऑफ दिल्ली’ या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

Sultan Of Delhi Trailer: मौनी रॉयच्या ‘सुलतान ऑफ दिल्ली’ या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

Sultan Of Delhi Trailer: मौनी रॉयच्या (Mouni Roy) ‘सुल्तान ऑफ दिल्ली’ या वेबसिरीजचा (webseries) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या वेब सिरीजची (Social media) कथा 1960 च्या आसपास काळातील असल्याचे बघायला मिळणार आहे. नुकतेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या सिनेमात मौनी रॉय ही मुख्य स्टार्स असणार आहे. ही वेब सिरीज’दिल्लीचा सुलतान:अर्णब रे’या पुस्तकावर आधारित आहे. काही मिनिटांचा ट्रेलरमध्ये मोठा ग्लॅमर पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. सोबतच त्याची ओटीटीवरील पहिली वेब सिरीज असणार आहे. या वेब सीरिजबद्दल बोलत असताना मिलन लुथरिया म्हणाले की, ‘सुल्तान ऑफ दिल्ली वेब सीरिज हा अर्जुन भाटियाचा प्रवास आहे. यामध्ये सत्तेसाठी लोभ, विश्वासघात, धैर्य आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी अर्जुन कसा प्रत्येक मर्यादा ओलांडतो हे दाखवण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

तसेच डिस्ने प्लस आणि हॉट स्टारने ‘सुलतान ऑफ दिल्ली’ वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर रिलीज करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले होते – ‘नशिबाच्या खेळात एकच जिंकेल.’ ही वेब सिरीज १३ ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या वेब सीरिजमध्ये मौनी रॉयशिवाय ताहिर राज भसीन, विनय पाठक, निशांत दहिया, अनुप्रिया गोएंका आणि हरलीन सेठी हे कलाकार बघायला मिळणार आहेत.

Rockstar DSP: लंडन कॉलिंगमध्ये रॉकस्टार डीएसपीची रंगणार अफलातून मैफिल

मिलन लुथरियाचे नाव बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीतील नाव आहे. ओटीटीवर पदार्पण करण्याअगोदर मिलनने अनेक सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये ‘द डर्टी पिक्चर’, ‘बादशाहो’, ‘टॅक्सी नंबर 9 2 11’, ‘तडप’, ‘कच्चे धागे’, ‘दीवार’, ‘चोरी चोरी’ आणि ‘हॅट्रिक’ यांचा समावेश आहे. टेलिव्हिजन व्यतिरिक्त मौनी रॉय अनेक चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. अलीकडेच अभिनेत्रीने मुंबईत एक रेस्टॉरंट उघडले असल्याची चर्चा सुरु होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube