Shrikanth मधील दमदार अभिनयाने राजकुमारने पुन्हा सिद्ध केलं अष्टपैलुत्व

Shrikanth हा चित्रपट रिलीज झाला आहे. यातून राजकुमार रावने पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले की, तो अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे.

Shrikanth मधील दमदार अभिनयाने राजकुमारने पुन्हा सिद्ध केलं अष्टपैलुत्व

Shrikanth

Shrikanth film Raikumar Rao Proof his Versatility : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता त्याचा ‘श्रीकांत’ ( Shrikanth )हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्याच्या या चित्रपटातील सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले आहे की, तो चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे.

लग्नानंतर प्रथमेशच पुनरागमन; ‘मुंबई लोकल’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच एकत्र दिसणार…

अंध उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत असलेल्या राजकुमार रावच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. अनेकांनी राजकुमार राव ने श्रीकांत उभेऊभ साकारला आहे असं देखील म्हटलं आहे.तुषार हिरानंदानी दिग्दर्शनात राजकुमार राव यांनी उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची निर्दोष भूमिका साकारणे हे त्यांच्या अतूट अभिनय कौशल्याचा पुरावा आहे. तो आउट-ऑफ-द-बॉक्स आणि मनोरंजक स्क्रिप्टसाठी पहिली पसंती का आहे हे देखील दाखवून जातो.

भारतीय संघात होणार मोठा बदल? बीबीसीआय ‘या’ पदासाठी मागविणार अर्ज

राजकुमार राव यांनी पडद्यावर वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखा साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘शाहिद’, ‘न्यूटन’, ‘ओमेर्टा’ आणि इतरांसह याआधी अनेक बायोपिकचा तो भाग आहे आणि प्रत्येक कामगिरीला प्रचंड प्रेम आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे आणि आता‘ श्रीकांत’ ही त्याच्या प्रसिद्ध चित्रपटसृष्टीत आणखी एक भर पडली आहे.

चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळाले असून हे सिद्ध होतंय की हा बायोपिक बॉक्स ऑफिसवर धमाल करेल ! श्रीकांत’ नंतर, अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेता अनेक आगामी प्रकल्पांमध्ये त्याच्या कामगिरीने प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज आहे. ‘स्त्री २’, ‘मि. आणि मिसेस माही, आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या वर्षी रिलीज होणार आहेत.

Exit mobile version