Shrikanth येतोय सर्वांचे डोळे उघडायला; चित्रपट प्रदर्शनास सज्ज, चाहते आतुर…

Shrikanth येतोय सर्वांचे डोळे उघडायला; चित्रपट प्रदर्शनास सज्ज, चाहते आतुर…

Shrikanth Film ready for relase : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता पुन्हा तो अशीच एक आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये तो अंध असणार आहे. ‘श्रीकांत’ ( Shrikanth ) असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

बिग ब्रेकिंग! राष्ट्रपतींना भेटणार इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ; ‘हे’ आहे कारण

तसेच या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो दृष्टिहीन प्रेक्षकही त्याचा तेवढाच आनंद घेऊ शकतात. कारण या चित्रपटांमध्ये दृश्यांबरोबरच आवाजाचं देखील तेवढाच महत्व ठेवण्यात आलं आहे. ‘श्रीकांत’ हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत भोल्लाच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती असलेली गोष्ट आहे. ज्याने आपली दृष्टी कमजोर होऊ दिली नाही आणि अखेरीस बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली.

अधर्माच्या आधारावर राम मंदिराचे काम, सत्तेत आल्यावर मंदिराचे शुद्धीकरण करू; पटोलेंचे मोदींना प्रत्युत्तर

10 मे 2024 ला “अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी” हा चित्रपट रिलीज होणार आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित या आगामी बायोपिकमध्ये ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्यासोबत पॉवरपॅक परफॉर्मर स्क्रीन शेअर करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज