Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) एका कार्यक्रमात जेन जेडीची प्रशंसा केलीयं. या चर्चेमध्ये श्वेता तिवारी, उर्वशी ढोलकिया, हितेन तेजवानी, बी. आर. विजयलक्ष्मी यांनी सहभाग घेतला होता. सक्षम आणि स्वतंत्रच्या मुद्द्यावरुन श्वेताने जेनचा उत्साह वाढणारं विधान केलंय. जेनला कोणीच रोखू शकत नाही, या शब्दांत श्वेताने जेनची प्रशंसा केलीयं.
सातारा हादरलं! PI कडून अत्याचार, हातावर सुसाईड नोट अन् डॉक्टरची आत्महत्या; फडणवीसांची थेट कारवाई
पुढे बोलताना श्वेता म्हणाली की, एकदा घराच्या दरवाजाची दुरुस्ती करण्यासाठी कामगाराला बोलावलं. पण पुरुष कामगार न येता महिला आल्याने श्वेता आश्चर्यचकीत झाली. महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, महिला काहीही करु शकतात, असं तिने म्हटलंय.
रोहित-कोहलीचा ‘दिवाळी धमाका’ ! तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया हरविले, कोहलीच्या नावावर मोठा विक्रम
तसेच माना कि हम यार नहीं मालिकेत खुशीच्या भूमिकेत असलेली जेन या सर्व नियमांना तोडून नव्या पिढीला महिलांची परिस्थिती दाखवत आहे. श्वेताने नव्या पिढीचा आत्मविश्वास आणि हिंमत वाढवण्यासाठी एक उदाहरण दिलं आहे. श्वेताच्या म्हणण्यांनुसार जेनला कोणीही रोखू शकत नाही. तिच्याकडे असलेला विचार आणि हिंमत तिला रोखू शकत नाही.
जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा… भाजपमधील जोरदार इन्कमिंगवरून गडकरींचा इशारा
श्वेताने यावेळी आपली मुलगी पलकचंही उदाहरण दिलं आहे. मेहनत, निडर आणि आपल्या दमावर आपण काहीही करु शकतो. स्टार प्लसवर लवकरच माना कि हम यार नही, मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये एक सशक्त महिला आणि त्यांच्या काही गोष्टींबद्दल वर्णन करण्यात आलंय. येत्या 29 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रदर्शित होणार आहे.
