Shyam Benegal passes away : सिने क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली. समांतर सिनेमाचे जनक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे निधन झाले. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी (दि. 23) त्यांनी ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने दुजोरा दिला आहे.
भुजबळांना मंत्रिपद का दिलं नाही? फडणवीसांनी घेतलं अजितदादांचं नाव, म्हणाले…
श्याम बेनेगल यांनी आज संध्याकाळी ६.३८ वाजता मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्या दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना यापूर्वीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून किडनी निकामी झाल्यामुळे त्यांनी घरीच डायलिसिस सुरू होते. दरम्यान, श्याम बेनेगल यांनी नुकताच 14 डिसेंबर रोजी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द
श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी एका कोकणी भाषिक चित्रापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. ते बारा वर्षांचे असताना त्यांचे छायाचित्रकार वडील श्रीधर बी. बेनेगल यांनी त्यांना दिलेल्या कॅमेऱ्यावर त्यांनी पहिला चित्रपट बनवला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. आणि तिथेच त्यांनी हैदराबाद फिल्म सोसायटीची स्थापना केली.
श्याम बेनेगल हे यांनी अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपट दिले. बेनेगल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानात ‘अंकुर’ आणि ‘निशांत’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘मंडी’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
श्याम बेनेगल ओळख केवळ भारतापुरती सीमित मर्यादित नाही. तर जगभरातील विविध प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवले गेले. भारतात समांतर चित्रपट चळवळ सुरू करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचे आघाडीवर होते.
श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. शिवाय, त्यांची सह्याद्री फिल्म्स नावाची कंपनी होती. त्यांना चर्निंग विथ विजय तेंडुलकर (1984), सत्यजित रे (1988), आणि द मार्केटप्लेस (1989) या त्यांच्या चित्रपटांवर आधारित त्यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत.
श्याम बेनेगल यांना 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहे. याशिवाय, अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1976 मध्ये, भारत सरकारने त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले. 1991 मध्ये कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2005 मध्ये श्याम यांना दादासाहेब फाळके पुरस्कार पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. आज त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टीवर दु:खांचा मोठा डोंगर कोसळला आहे.