Download App

Tere Sang Ishq Hua: राशीचे ‘योद्धा’ मधील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला

Tere Sang Ishq Hua Song Release: युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना (Rashi Khanna) पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपट “योद्धा” (Yodha Movie) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमातील रोमँटिक गाणं ‘तेरे संग इश्क हुआ’ (Tere Sang Ishq Hua Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. राशीची सिद्धार्थ मल्होत्रासोबतची (Siddharth Malhotra) जोडी यातून बघायला मिळणार आहे.

अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी हे गाणं गायले आहे तर तनिष्क बागचीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे आणि कुणाल वर्माने हे गाणे लिहिले आहे. राशी ही अष्टपैलू पॉवरहाऊस आहे हे पुन्हा एकदा यातून कळून येत आहे.  सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योधा’ हा एक ॲक्शन थ्रिलर आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, राशि खन्ना आणि दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत आणि 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होतो. ‘योधा’ व्यतिरिक्त, राशी ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये विक्रांत मॅसीच्या सोबत दिसणार आहे. हिंदीमध्ये ‘टीएमई’, तर ती तामिळमध्ये ‘अरनमानाई 4’मध्ये दिसणार आहे. सिद्धू जोन्नालगड्डासोबत ‘तेलुसू काडा’ नावाचा एक तेलुगु चित्रपटही तिच्याकडे आहे.

Madgaon Express सिनेमातील नोराचा ‘बेबी ब्रिन्ग इट ऑन’ गाण्याचे टीझर रिलीज

राशी खन्नाच्या योद्धा सिनेमा सुरूवातीला 11 नोव्हेंबर 2022 दिवशी रिलीज होणार होता, मात्र निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जुलै 2023, 15 सप्टेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आणि नंतर 8 डिसेंबर 2023 केली होती. आता हा सिनेमा 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा नुकतचं विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टीसोबत ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळाला होता.

follow us