Download App

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीच्या मलेशिया दौऱ्यानंतर ‘यूके टूर’ नं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Rockstar DSP Promotional Video: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) जानेवारी 2024 मध्ये युनायटेड किंगडमला (United Kingdom) एका नवीन टूर घेऊन येत असून तो यासाठी सज्ज झाला आहे. (UK Tour Show) भारतीय मनोरंजन क्षेत्रातील त्याचा हा प्रवास एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. प्रसिद्ध असलेल्या या संगीत कलाकाराने पहिला तेलुगू प्रमोशनल व्हिडिओ रिलीज (Promotional Video) केला असून आता चाहत्यांची उत्सुकता लागली आहे.


लंडनमध्ये शूट केलेल्या “DSP LIVE” च्या सुंदर प्रोमोची एक झलक सध्या सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली आहे. यामध्ये रॉकस्टार डीएसपीच्या आगामी यूके टूरमध्ये त्याच्या संगीताची जादू सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे. हा नवीन प्रोमो नक्कीच त्याच्या चाहत्यांच्या मैफिलीसाठी किती उत्साही आहे, हे दाखवून देणारा ठरणार आहे. 2024 मध्ये DSP अनेक कमाल प्रोजेक्ट करणार असून “पुष्पा: द रुल,” आणि विकास बहल दिग्दर्शित “उस्ताद भगत सिंग” या आर. माधवन आणि अजय देवगण यांच्या सहकार्याने विविध शैली हाताळण्यात त्यांची अष्टपैलुत्व दाखवून देणारे प्रकल्प असबर आहेत.

शिवाय बालकृष्ण आणि बॉबी यांच्यासोबत एक रोमांचक चित्रपटावर सध्या जोरदार काम सुरू आहे. रॉकस्टार डीएसपीला नुकताच “पुष्पा: द राइज” या सिनेमातील उत्कृष्ट कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच नाही तर संगीत क्षेत्रातील त्याच्या उल्लेखनीय कामाचं कौतुक असल्याचे त्याने यावेळी सांगितलं आहे. डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या रॉकस्टार डीएसपीने त्याचा हा पुरस्कार चाहत्यांसह आणि पापाराझी सोबत साजरा केला.” पुष्पा: द राइज” साठी रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याने चाहत्यांची आणि समीक्षकांची सारखीच प्रशंसा झाली आहे, आणि पापाराझींना त्याच्या या पुरस्काराचे कौतुक केलं आहे.

Randeep Hooda Marriage: मणिपुरी अंदाजात रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल…

संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाच्या संगीताचे भरभरून कौतुक केले.अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी ‘दृश्यम 2’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Tags

follow us