Mrs Asia GB: कौतुकास्पद! ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T180142.951

Mrs Asia GB Sonal Kale : मराठमोळी मुंबईकर सोनल काळेने (Sonal Kale) ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा (MRS. Asia Great Britain) किताब पटकावला आहे. (Mrs Asia GB Sonal Kale) ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सोनलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, नमस्कार… मी सोनल काळे… बॉलिवूडची कोरिओग्राफर असण्याबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुअंसर देखील आहे. कंटेट क्रिएट करण्याची मला आवड आहे. मी जन्माने भारतीय आहे. मनाने महाराष्ट्री अन् आहे तर राहायला परदेशात आहे. मी गुजराती व्यक्तीबरोबर लग्न केले आहे. मला महाराष्ट्राचा आणि गुजरातचा खूप अभिमान आहे. एक नवीन संस्कृती आत्मसात करायला मला आवडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by S O N A L K A L E | Chai lover | Dancer | model (@chaiwali_ladki)


सोनलने पुढे असेही लिहिलं आहे की, मिळालेल्या संधीचं मी सोनं केले आहे. आता माझ्या स्वप्नांना मी सत्यातमध्ये उतरवणार आहे. या स्पर्धेने आता मला एक आत्मविश्वास दिला गेला आहे. आता मला माझं व्यक्तिमत्त्व खूपच प्रभावशाली करायचे आहे. तसेच नवोदितांचा आत्मविश्वास वाढेल याकरिता मी सतत प्रयत्न करायचा आहे. नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मी त्यांना मदत करणार आहे. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी मी मदत करणार आहे.

सोनल काळे नेमकी कोण आहे ?

सोनलचा (Sonal Kale) जन्म मराठी कुटुंबियांमध्ये झाला. ती सातारा जिल्ह्यातील वाई या गावची आहे. तिचे आई – वडिल हे मुंबईतील कांदिवली याठिकाणी वास्तव्याला आहेत. सन २००८ साली सोनल ही लंडन याठिकाणी उच्चशिक्षणासाठी गेली होती. ती एक इन्फ्लूएंसर, फ्रिस्टाईल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर आहे. तिने शिक्षण पुर्ण केल्यानंतर लंडनमध्येच नोकरी करत त्याच ठिकाणी स्थायिक झाली.

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

याप्रसंगी सोनल म्हणाली की, मी जन्माने भारतीय असून मनाने मराठी आहे. गेली १५ वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. लग्न झाल्यानंतर मी गुजराती झाले आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रीयन आणि गुजराती या दोन्हींमध्ये समन्वय ठेवते. मिसेस आशिया जीबी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्र्वास मिळवणे हा आहे. माझ्या नवीन प्रवासात मला अशा लोकांसाठी रोल मॉडेल व्हायचे आहे. ज्यांच्यामुळे नृत्य करण्याचा, स्वत:ला व्यक्त करण्याचा आत्मविश्र्वास नाही, म्हणून मी येथे मानसिक आरोग्य, प्रेम आणि दयाळूपणा या गोष्टींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आले आहे.

Tags

follow us