Download App

‘अमलताश’चं नवं पर्व नेमकं कसा होता? सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडेनी थेटच सांगितलं… 

Rahul Deshpande On Amaltash Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर (Social media) कायमच सक्रीय असतात. (Marathi Movie) ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (Amaltash Movie) तर आता ‘अमलताश’चं नवं पर्व नेमका कसा होता? याबद्दल सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी महत्वाची माहिती सांगितली.

म्हणाले की, मी त्या बाबतीत खूप नशीबवान समजतो. एखादी गोष्ट संबंधित राहण्यासाठी मी केली नाही. म्हणजे डिजिटलचा प्रेझंर्स असेल, कॉव्हिडच्या वेळेस माझ्याकडे काही नव्हतं करायला, युट्युब चॅनेल सुरु केलं होत, मात्र त्यावर टाकण्यासाठी माझ्याकडे कोणतेही व्हिडिओ नव्हते. तर त्यावेळेस मला जी गाणी आवडायची ते गाणी गायला सुरुवात केली. आणि त्या गाण्याबद्दल थोडस बोलायला सुरुवात केली.

त्यावेळेस ते लोकांनाच नाहीतर कलाकारांना देखील आवडायला लागलं. आणि त्यामुळे मला ती ऊर्जा मिळाली, अन् करत राहिलो. आणि त्याचा मी मागोवा घेतला, जायच्यातून मला नवीन गुरु लताताई असतील, आशाताई असतील असे अनेक माझ्या ऐकण्यात आले. त्यामुळे मी समृद्ध होत गेलो. आणि ‘अमलताश’ हा आमचा पहिला प्रयत्न होता.

कुणी तरी येणार येणार गं…! दीपिका आणि रणवीर होणार आई-बाबा, सर्वत्र चर्चांना उधाण

पुढे म्हणाले की, या सिनेमाच्या वेळेस आम्ही सर्व मित्र एकत्र होतो. आणि सर्व फोटो ग्राफर, माझे मित्र गिफटेड फोटो ग्राफर होते. आणि सिनेमाबद्दलची गोष्ट सांगितली. आणि मला असं वाटलं की, हे मी करू शकतो. कारण हे माझं सोंग म्हणा किंवा त्या अभिनयाला जमेल असं होत. आणि मग त्यांनी मला जस सांगितलं, त्याप्रकारे सुरुवात केली. रोज मी ज्या सकाळी फिरायला जायचं, तर ते डायलॉग घेऊन जायचो. तर आपण  काय करतो की, एकमेकांशी जेव्हा सवांद करतो. त्या संवादाशी किंवा त्या इमोशनशी कनेक्ट होऊन आपण सवांद साधतो. तर अनेकदा असं असत की, आपण गाण्याला देखील कसं रिऍक्ट होतो.

या सिनेमात गायक राहुल देशपांडे हे मराठी सिनेमातील कथा ही संगीतामधून पुढे घेऊन जात असल्याचे पाहायला मिळणार आहे. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यामध्ये एक परदेशी मुलगी आल्याचं दिसणार आहे, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचं ‘त्या’ कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या नेमक्या कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका अनोख्या अंदाजात दिसत आहेत. या सिनेमात सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट असणार आहे.

follow us