सुनील प्रभूंकडून मला एकही व्हीप बजावण्यात आला नाही; उदय सामंताचा दावा
Shiv Sena MLA disqualification hearing : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात(Shiv Sena MLA disqualification) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे गटाच्या प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली. यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची सुनावणी सुरू झाली आहे. आजपासून उदय सामंत यांची उलटतपासणी सुरू झाली आहे.
विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात येणार? मुंबई अन् नागपूरमध्ये होणार खलबतं
आजचा युक्तीवाद-
कामत – १९९९ पासून 2019 पर्यंत शिवसेना भाजपा ही नैरसगिक युती होती, असं तुम्ही प्रतिज्ञापत्रात म्हटलं हे खरं आहे का.?
सामंत -ही नक्कीच नैसर्गिक युती होती. 2019 मध्ये देखील आम्ही युती म्हणूनच एकत्र लढलो होतो..आम्ही वेगळे का लढलो याची मला कल्पना नाही.
कामत – आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना आपला बी फॉर्म कोण सही करायचं?
सामंत -मी राष्ट्रवादी असो किंवा अन्य वेळी मी पक्षावर विश्वास ठेवून एबी फॉर्म घ्यायचो. सही कोणी केली हे बघत नव्हतो.
कामत – तुम्ही तुमच्या उत्त्तरात असं म्हटलं आहे की, सही कोणी केली हे बघत नव्हतो. याचा अर्थ पॉलिटिकल पार्टी हे देत होती हे मान्य आहे का?
Mrunmayi Deshpande : मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फिदा
सामंत -ज्या पक्षातून आम्ही निवडणुका लढलो होतो, तेव्हा कधीच अभ्यास केला नाही की हे फॉर्म कोण देतं.
कामत -आमल्या मते राजकीय पक्षातील कुठलाही नेता A- B फॉर्म देऊ शकतो का ?
सामंत –याबाबत मी अभ्यास केला नसल्यामुळे मला माहित नाही.
कामत -मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा 2019 च्या विधानसभेचा A-B फॉर्म हा सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी सही केल्या होत्या. हे चूक की बरोबर ?
सामंत -याचं उत्तर मी आधीच दिलं आहेत. मी नुसता A-B फॉर्म घेतला होता. त्यामुळे त्यावर सही कोणी केली. हे मी बघितलं नाही. याच्याशी मी सहमत नाही.
कामत -हे खरं आहे का- की शिवसेना हा राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आपल्या पक्षाच्य नेते पदाची रचना निवडणूक आयोगाला कळवत असे आणि ती रचना वेबसाईटवर टाकत असे
सामंत -शिवसेनेच्या घटनेबाबत मला पूर्ण अभ्यास नाही. परंतु 1999 ची घटनादुरुस्ती ही वेबसाईटवर आहे आणि मला वाटतंय त्यावरच शिवसेना पक्ष चालतो अशी माझी धारणा आहे.
कामत -शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षातील नेते पदातील व्यक्तींची नावं नमूद केली आहेत का ?
सामंत -याबाबत मला काहीच कल्पना नाही. मात्र मनोहर जोशी, जे आज हयात नाहीत ते सुधीर जोशी, रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे आणि अन्य आहेत, हे मला बैठकीला आल्यावर समजायचं
कामत – प्रश्न क्रमांक 11 मध्ये तुम्ही बैठकांना उपस्थित राहिल्याचा उल्लेख केला आहे त्या कधी झाल्या?
सामंत -त्याचा काही विशिष्ठ काळ नव्हता. मीटिंग व्हायच्या, सभा व्हायच्या.
कामत– 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावरील बैठकीला उपस्थित होतात. 21 जून 2022 रोजी तुम्हाला सुनील प्रभू यांचा पक्ष आदेश मिळाल्याने तुम्ही उपस्थित होता का?
सामंत – 21 जून रोजी माझे विधिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे सांगितले आणि त्यांनी मला निमंत्रित केले. पण ही बैठक कशाबद्दल होती हे मला सांगण्यात आले नाही. मी या बैठकीला उपस्थित होतो पण त्या दिवशी किंवा त्यानंतर मला कोणताही व्हीप देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही आणि कोणत्याही कागदावर सही केलेली नाही. सुनील प्रभू यांनी मला एकही व्हीप दिलेला नाही.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर निकाल द्यायचा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनातही सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.