Download App

Snehal Rai Accident: अभिनेत्री स्नेहल रायच्या कारचा अपघात, पुण्याच्या दिशेने जाताना जोरदार धडक

Snehal Rai Accident: ‘इश्क का रंग सफेद’ फेम अभिनेत्री स्नेहल रायच्या गाडीचा अपघात झाला आहे. (Snehal Rai Accident) पुण्याच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने तिच्या कारला जोरदार धडक दिली आहे. यामुळे गाडीचे बंपर आणि मडगार्डचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Snehal Rai) ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी वळवण्याने गाडीतील सर्वांचा जीव वाचला आहे. (Pune Police) गाडीतील कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


स्नेहल रायचा ड्रायव्हर आणि तिला गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. त्यानंतर तिने तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले, अशी माहिती अभिनेत्रीने यावेळी दिली आहे. अचानक एक ट्रक आला आणि माझ्या कारला जोरदार धडकला.

माझ्या ड्रायव्हरचे आभार की त्याने माझा जीव वाचवला. आम्ही पोलिसांना कॉल केला आणि ते १० मिनिटांत पोलीस तिथे पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनमधील योगेश भोसले यांनी खूप मदत केली असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे. अपघातानंतर मी खूप घाबरले होते, त्यांनी मला ग्लुकोज दिले आणि आवश्यक ती मदत केली.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

तसेच घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता आणि तिच्याकडे वाहनाची कोणतीही माहिती नसल्याने ती एफआयआर दाखल करू शकली नाही. या घटनेने स्नेहल हादरली असून ती हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us