Sonu Nigam : गायक सोनू निगमचा आज 50 वा वाढिदवस आहे. सोनू निगमने त्याचा 50 वाढदिवस मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये धुमधडाक्यात साजरा केली. यावेळी सोून निगमने गाण्यांची मैफिल रंगवत थाटात वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेत्यांसह कलाकारांनी हजेरी लावत सोनूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“गुरुजीला अटक करा बोलला” : भिडेंविरोधातील भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाणांना धमकीचा मेल
50 वाढदिवसानिमित्त सोनूने काळा सूट परिधान केला होता. वाढदिवसांच्या पार्टीमध्ये सोनूने “छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जिये, हर घडी बदल रही है रूप जिंदगी, जो है समान कल हो ना हो” गाण्यांची मैफिल रंगवली होती. याचदरम्यान सोनूने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे.
मागील काही दिवसांत वादग्रस्त विधानांमुळे सोनू निगमचे चित्रपटसृष्टीत अनेक शत्रू बनले होते. सोनू निगमने केलेल्या विधानांमुळे ज्या लोकांशी सोनूचं शत्रुत्व निर्माण झालं होतं, त्यांनीही सोनूच्या वाढदिवसाला हजेरी लावत शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं आहे. ही त्या वेळची गोष्ट असल्याचं म्हणत सोनू निगमनेही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा बॉक्स ऑफिसवर जलवा; दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई
यावेळी सोनू निगम म्हणाला, माझ्य फिटनेसकडे मी अधिक लक्ष देतो, दररोज व्यायाम करतो, आयुष्यातील प्रत्येक क्षणी आनंदी राहण्यासाठी माझा हा एकमेव अजेंडा आहे. मी आनंद, प्रेम आणि सर्वकाही शेअर करत राहतो. कारण मला माहीत आहे की मी पुढच्या क्षणी किंवा उद्या मरू शकतो. जीवनाची शाश्वती नाही. म्हणूनच मी प्रत्येक क्षणी खूप आनंदी असतो आणि स्वतःवर खूप प्रेम करत, असल्याचं सोनूने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहुरीत लव्ह जिहाद! क्लासेसच्या नावाखाली सुरु होते धर्मांतर, शिक्षिकेसह चौघांना अटक
सोनू निगमच्या वाढदिवसाची रात्र रंजक बनवण्यासाठी सोनूचे वडील आगम कुमार निगम, तीशा निगम, मीनल निगम, यांच्यासह राज ठाकरे, आनंदजी, हरिहरन, अमृता फडणवीस, शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, आकाशदीप, शिंबा साबीर, प्रताप सरनाईक, राजू सिंग, सचिन पिळगावकर मुलगी श्रिया पिळगावकर, पापोन, अनु मलिक, भूषण कुमार, संजीव कपूर, जितेंद्र, संजय टंडन, सौरभ दफ्तार्य, सुनिधी चौहान, यांच्यासह इतरही अनेक कलाकारांनी हजेली लावली होती.
दरम्यान, सोनूने हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला असून ही रात्र रंजक होण्यासाठी गायकांनी मधुर संगीताने पहाटेपर्यंत हॉल गुंजवल्याचं पाहायला मिळालं.