राहुरीत लव्ह जिहाद! क्लासेसच्या नावाखाली सुरु होते धर्मांतर, शिक्षिकेसह चौघांना अटक

राहुरीत लव्ह जिहाद! क्लासेसच्या नावाखाली सुरु होते धर्मांतर, शिक्षिकेसह चौघांना अटक

अहमदनगर – लव्ह जिहादचे (Love Jihad) प्रकार घडत असताना पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात (Rahuri News) घडली आहे. तालुक्‍यातील दोन अल्पवयीन मुलींना तुमचा धर्म सोडा व आमचा धर्म स्वीकारा म्हणत त्यांचा विनयभंग (molestation) करण्यात आला. तसेच त्यांच्या क्लासच्या शिक्षिकेने आमच्या धर्मांच्या मुलांबरोबर बोलत जा, अशी चिथावणी दिल्याने त्या शिक्षिकेसह नऊ जणांवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे क्लासच्या नावाखाली हा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे उघड होताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Attempted conversion of school girl arrested four including a teacher)

याबाबत अधिक माहिती अशी, 26 जुलैला उंबरे गावात साधारणतः आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या काही अल्पवयीन मुली एका शिक्षिकेकडे गेल्या वर्षभरापासून घरगुती क्लाससाठी जात होत्या. यातील दोन पीडित मुली क्लासला जात असताना त्यांना थांबवून आरोपी त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करायचे. मुली क्लासमध्ये गेल्यावर तेथील आरोपी महिला शिक्षिका पीडीत मुलीला तुम्ही माझ्या धर्माच्या मुला-मुलींशी बोलत जा, असे सांगुन आरोपीशी जाणीवपूर्वक बोलायला लावायची.

धर्मांतर प्रकरणावर विखे संतापले…पोलिसांना दिले महत्वाचे आदेश 

तसेच तुम्ही हिंदू धर्म सोडून आमचा मुस्लिम धर्म स्वीकारा तसेच बुरखा घालत जा, म्हणजे हिंदू मुले तुम्हाला त्रास देणार नाहीत. आमच्या मुस्लिम धर्माच्या मुली जशा राहतात तशाच पद्धतीने राहत जा. आपण लवकर घर सोडून पळून जाऊ, असे सांगायची. आमचे न ऐकल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, असे उंबरे येथील पीडित अल्पवयीन मुलींनी सांगितले.

याबाबत पीडीत मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व पोक्सोअंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक निरज बोकील व दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे करीत आहेत. याप्रकरणी महिला शिक्षिकेसह चौघांना अटक करण्यात आली. तर आणखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube