Download App

Fateh: सोनू सूदचा ‘फतेह’चा फर्स्ट लूक रिलीज: दमदार ॲक्शन अवतारात दिसणार अभिनेता

Sonu Sood Fateh First Look Release: अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने (Sonu Sood) त्याच्या आगामी ‘फतेह’ (Fateh Movie) चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला असून आता चाहते यासाठी उत्सुक आहेत. (Social Media) दमदार ॲक्शन फिल्ममध्ये जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मुख्य भूमिकेत दिसणार असून सोनू सूद या चित्रपटद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. फतेहचं पोस्टर नक्कीच खास आहे कारण प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि उत्तम गोष्ट बघायला मिळणार यात शंका नाही.

सोनू या चित्रपटात काहीतरी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असं देखील कळतंय. सायबर क्राइम थ्रिलर असलेल्या चित्रपटाचे लेखन आणि निर्मितीही सोनूने केली आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित हा चित्रपट सायबर क्राईमच्या गुंतागुंत आणि आव्हानांभोवती दिसणार आहे. या चित्रपटात काही चित्तथरारक ॲक्शन सीक्वेन्स देखील असून जे हॉलीवूड स्टंट तज्ञ ली व्हिटेकर यांच्या देखरेखीखाली पार पडले आहेत.

‘फतेह’ भारत, यूएसए, रशिया आणि पोलंडसह जगभरातील ठिकाणी शूट झाला असून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अफलातून गोष्ट बघायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना सोनू सूदने म्हणतो ‘फतेह’ ची कथा अशी आहे ज्याने माझी उत्सुकता वाढवली आणि म्हणून मी हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटाचा विषय या महत्त्वपूर्ण असून अश्या विषयाकडे प्रेक्षकांनी वेगळ्या नजरेतून बघावं अस मला वाटत” फतेह या वर्षी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Breaking: अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतेत

बॉलिवूडचा हा अभिनेता केवळ पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील देखील हिरो असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या काळामध्ये सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत असतो. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आज देखील अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करताना दिसत असतो. आजही त्याच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांना रांग लागलेली असते. केवळ गरजू लोकच नाही तर, अभिनेत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील मदत करण्याचा वसा हाती घेतल्याचे पाहायला मिळत असतो.

follow us

वेब स्टोरीज