Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा त्याच्या अभिनयासह नेहमीच त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. यावेळी देखील त्याने दिव्यांग लोकांसाठी आवाज उठवला आहे. सोनू सूदने बिहारसह सर्व राज्य आणि केंद्र सरकारकडे दिव्यांगांसाठी देण्यात येणारी पेन्शन वाढवण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
Maratha Reservation साठी नोंदी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जातीवाद; जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सोनूने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका दिव्यांग व्यक्तीसोबत संवाद साधत आहे. सोनू म्हणतो की, मी आज बिहारमधील वैशाली येथील धर्मेंद्र सोबत आहे. जो एक दिव्यांग व्यक्ती आहे. सरकार या दिव्यांग लोकांना महिन्याला चारशे रुपये पेन्शन देते. मात्र या चारशे रुपयांमध्ये महिन्याचा खर्च भागणे शक्य नाही.
राजू शेट्टी’मातोश्री’वर; महाविकास आघाडीसोबत जाणार? शेट्टींनी क्लिअर केलं
त्यामुळे सरकारने कमीत-कमी हजार बाराशे किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन या दिव्यांग लोकांना दिली पाहिजे. अशा प्रकारच्या दिव्यांग लोकांना देशातील सर्वच राज्यातील सरकारांनी ही पेन्शन वाढवली पाहिजे. अशी मागणी यावेळी सोनूने केली. त्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, माझा नवीन वर्षाचा संकल्प, दिव्यांग लोकांचा त्यांचा हक्क मिळवून देणे. मी संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला कळकळीची विनंती करतो.
झारखंड : पत्नीला सूत्र सोपवून CM सोरेन राजीनाम्याच्या तयारीत; पण ‘एका’ नियमाने मनसुब्यांना सुरुंग
दिव्यांग व्यक्तींना दिली जाणारी पेन्शन ही किमान त्यांचं महिन्याचा खर्च भागू शकेल म्हणजे त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील. एवढी देण्यात यावी. ते ज्या शारीरिक व्यंगाला सामोरे जात आहेत. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये मात्र या पेन्शनमुळे ते चांगल्या प्रकारे जगू शकतात. असं म्हणत सोनूने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधान कार्यालय यांना ही पोस्ट टॅग केली आहे.
सोनू सूदने दिव्यांगांसाठी अधिक मदतीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहे. या वर्षी तो “फतेह” नावाच्या चित्रपटात काम करणार आहे . सोनू आणि जॅकलीन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.