Sonu Sood : अभिनेता सोनू सूद नेहमीच त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्यात त्याने लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत करणारा एक जागरूक अभिनेता ठरला आहे. त्याचे हेच अनुभव त्याने एका कार्यक्रमामध्ये सांगितला. त्याने सांगितलं की, चित्रपटातील ग्लॅमर शूटींग प्रसिद्धी यामध्ये त्याला वास्तविक जीवन काय आहे? याची जाणीव झाली.
विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट सवाल
तो पुढे सांगतो, खरा आनंद हा सामान्यांच्या आयुष्यात आनंद आणल्याने मिळतो. हे त्याला लॉकडाऊनमध्ये समजलं आहे. त्याने सांगितलं की, लोकांशी वैयक्तिक संवाद साधणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी ते महत्वाचे ठरते. त्यामुळे आपण आपल्या संपर्कातील दररोजच्या लोकांशी आणखी मजबूत संबंध निर्माण करू शकतो. तसेच अनोळखी लोकांची मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
राज्यात कॅसिनोला परवानगी नाही, कायदाच रद्द! राज्य सरकारचा निर्णय
अभिनेता सोनू सूदबद्दल आणि त्याला हा अनुभव कसा मिळाला? याबद्दल सांगायचे झाले. तर जेव्हा संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये त्रासल होत. तेव्हा सोनूने लोकांना मदत करत त्यांना समस्यांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या याच अनुभवावर तो म्हणतो की, लॉकडाऊनमध्ये मी जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याचे हे अनुभव त्याने एमटीव्हीच्या रोडीज – कर्म या कांडच्या एका भागात सांगितला आहे. त्याच्या या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. तर सोनूला अभिनयासह एक वेगळी ओळख मिळाली.