Download App

नाट्यप्रेमींसाठी पर्वणी! सृजन द क्रिएशनचे ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ प्रेक्षकांच्या भेटीला

  • Written By: Last Updated:

Srijan  Creation News Play : कलाक्षेत्रात कार्यरत असलेली सृजन द क्रिएशन (Srijan The Creation) ही संस्था गेली तीन वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. गेल्या तीन वर्षात या संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक प्रतिष्ठित स्पर्धेत पुरस्कार मिळवले आहेत.

बच्चू कडूंचा मास्टरस्ट्रोक! दादा भुसे आणि झेडपी प्रशासनाला अंधारात ठेवून दिव्यांग भवनाचे उद्घाटन

दरम्यान, यावर्षी सृजन द क्रियेशन या संस्थेच्या कलाकारांनी राज्यनाट्य स्पर्धेत तीन नाटकं सादर केली. त्यातील अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाला साहित्य संघ केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाला.

कुणबी दाखला घेणार? अजितदादांनी सूर लावूनच सांगितलं 

येत्या २४, २५ आणि २६ डिसेंबर रोजी विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकाचे पाच प्रयोग होणार आहेत. मित्राची गोष्ट या नाटकाचा प्रयोग २३ डिसेंर रोजी सकाळी १० वाजता, दुपारी ३ वाजता आण सायंकाळी ७ वाजता आहे. तर २४ डिसेंबर रोजी याच नाटकाचा प्रयोग सायंकाळी ७ वाजता आहे. तर ज्याचा त्याचा प्रश्न या नाटकाचा प्रयोग २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता, दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता आहे. तर २६ डिसेंबर आणखी एक प्रयोग रोजी दुपारी ३ वाजता आहे.

ॲक्टिविटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पूर्व येथे होणार आहेत. तरी मराठी नाट्य रसिकांनी ह्याचा लाभ घ्यावा.

Tags

follow us