स्टार प्लसने गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांच्या मनात घर (series) करणाऱ्या वैविध्यपूर्ण मालिकाने प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे तर सोबतीला आयकॉनिक प्रेमकथा देखील त्यांनी यातून दाखवल्या आणि नात्यामधली भावनिक बाजू महत्त्वपूर्ण पद्धतीने दाखवली आहे. भावनिक आणि मनाला भिडणारे कार्यक्रम दरवेळी सादर करण्यासाठी ओळखला जाणारा या चॅनेलने प्रभावी कथनशैली आणि लक्षात राहणाऱ्या पात्रांमुळे भारतीय टेलिव्हिजनवर कथे मधली गंमत आणि त्यातली पात्र जिवंत ठेवली आहेत.
हीच परंपरा पुढे नेत आता स्टार प्लस आपल्या आगामी ‘तारा’ या शोद्वारे आणखी एक नवीकोरी आणि भावनिक प्रेमकथा सादर करण्यासाठी सज्ज होत आहे. निर्मात्यांनी नुकताच या शोचा नवीन प्रोमो रिलीज केला असून त्याने प्रेक्षकांमध्ये वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे. मार्च महिन्यात प्रीमियर होण्याची अपेक्षा असलेल्या या शोमध्ये क्रुशल आहुजा ‘युवराज शेखावत’ आणि कनिका कपूर ‘तारा’ या भूमिकेत दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये त्यांच्या भावनिक आणि रोमँटिक प्रवासाची एक छोटीशी झलक पाहायला मिळते.
अभिनेते प्रसाद ओक यांचा नवा विक्रम, एकाचवेळी दोन ग्लोबल रेकॉर्डमध्ये नाव
प्रोमोची सुरुवात तारा युवराजची बॅग पॅक करताना होते जिथे ती खेळकरपणे सांगते की ‘राजा बाबू’ दोन दिवसांत दूर जाणार आहे. त्यानंतर युवराज येतो आणि तिच्या जखमी बोटाकडे लक्ष देतो. तो प्रेमळपणे विचारतो की तिने जखम का लपवली आणि ती त्याचं ऐकत नाही तेव्हा त्याला किती राग येतो हे सांगतो यातून तिच्याबद्दलची त्याची खोल काळजी दिसून येते.
क्षण अधिक भावनिक होतो जेव्हा तारा सांगते की तिच्या नावासारखं काहीच तिच्यात नाही आणि सगळे तिच्यावर रागावतात. मात्र युवराज तिला प्रेमाने समजावतो आणि तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो. तो तिची काळजी घेतो आणि तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे दोघांमधील एक सुंदर आणि हृदयस्पर्शी क्षण निर्माण होतो. यात त्यांच्या नात्यातील गोडवा, काळजी आणि भावनिक नातं स्पष्टपणे दिसून येतं.
युवराज आणि तारा यांच्यातील केमिस्ट्री ही लक्षवेधी ठरली असून प्रेक्षकांच्या मनात त्यांचा जोडीने आधीच घर केलं असल्याचं दिसतंय. भावनिक नात्याची प्रेमाची केमिस्ट्री आकर्षक आणि उबदार वाटणारी कथा जी या प्रेमकथेचं सौंदर्य अधिक खुलवत आहे. या नव्या शोद्वारे स्टार प्लस पुन्हा एकदा साधी भावनिक आणि मनाला भिडणारी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे ‘तारा’ आणि ‘युवराज’ यांच्या प्रवासाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
