Download App

Stree 2 चा टीझर आउट! राजकुमार राव बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज

Stree 2 चा टीझर आऊट झाला आहे. त्यामुळे आता तो श्रीकांत, मिस्टर आणि मिसेस माही नंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Stree 2 Teaser Out Rajkumar Rao Ready for Hattrick on Box Office : राजकुमार राव (Rajkumar Rao) स्टारर स्त्री 2 (Stree 2 ) टीझर आऊट झाला आहे. त्यामुळे आता तो श्रीकांत, मिस्टर आणि मिसेस माही नंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर (Box Office) हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. केवळ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ‘स्त्री 2’ चा टीझर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भय, विनोदी आणि भरपूर मनोरंजनाची एक रोलरकोस्टर राईड देणारा स्त्री 2 चा टीझर प्रेशकांच मनोरंजन करणार यात शंका नाही. टीझरच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना ‘स्त्री’ परत आल्याचे सांगण्यात आले आहे तर राजकुमार रावच्या विक्की या पात्राची पुन्हा ओळख यातून करून देण्यात आली आहे.

चीनच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तान घाबरला; ‘या’ खास ऑपरेशनने करणार CPEC सुरक्षित

टीझर ला खूप प्रेम आणि उत्साहाने प्रतिसाद मिळत असून तो चित्रपट राजकुमार रावचा या वर्षातील सलग तिसरा हिट चित्रपट असेल असे म्हंटल जातंय. या अभिनेत्याने यापूर्वी ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’सह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आणि ‘स्त्री 2’ च्या टीझरला मिळालेला प्रतिसाद हा पुरावा आहे की राव बॉक्स ऑफिसवर हॅट्ट्रिक करेल याची खात्री आहे. 2024 हे वर्ष अभिनेत्याचे आहे ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असताना, ‘स्त्री 2’ राजकुमार रावचे सर्व रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे, आणि तो सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मर असल्याचे सिद्ध करत आहे.

‘स्त्री 2’ व्यतिरिक्त जो 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राजकुमार रावचा आणखी एक चित्रपट या वर्षी रिलीज होणार असून ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्याकडे अनेक मनोरंजक लाइनअप देखील आहेत ज्यांची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

follow us

वेब स्टोरीज