Download App

Subhedar: हाती तलवार अन् नजरेत अंगार! ‘सुभेदार’ सिनेमातील अजय पुरकरचा लूक पाहिलात का?

Subhedar: अजय पुरकर यांचा ‘सुभेदार’ (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असल्याचे दिसून येत असतात. (Ajay Purkar) या सिनेमाचा टीझर गेलूया काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सुभेदार या सिनेमध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका नेमकी कोण साकारणार आहे? असा सवाल चाहत्यांना या सिनेमाचा टीझर बघतल्यावर पडला होता.


परंतु आता या सावलाचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या सिनेमात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत असल्याचे माहिती झाले आहे. त्यांनी नुकताच सुभेदार या सिनेमामधील पहिला लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अजय पुरकर यांनी सुभेदार या सिनेमातील लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत…हर हर महादेव !!!’

अजय पुरकर यांना तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेमध्ये बघण्यासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. अजय पुरकर यांनी सुभेदार या सिनेमामधील लूकचा फोटो शेअर केल्यावर अनेकांनी या फोटोवर लाइक्स व कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने कमेंट केली आहे की,’अंगावर शहारे आणणारा लूक’ खूपच भारी दिसत आहे. तसेच ‘सुभेदार’ हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सुभेदार या सिनेमात  छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

चाहते या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या सिनेमामधील अजय पुरकर यांच्या अभिनयाला चाहत्यांनी मोठी पसंती मिळवली आहे. आता अजय पुरकर यांच्या ‘सुभेदार’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट या सिनेमामध्ये देखील अजय पुरकर यांनी काम केले आहे. अजय पुरकर हे त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमी मनं जिंकत असल्याचे दिसून येत असतो.

Tags

follow us